पाणीप्रश्नावर सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आत्राम यांचा आवाज बुलंद

नदीला मुबलक पाणी असल्यावरही अपुरा पाणीपुरवठा का? आत्राम यांचा सवाल

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील नागरिकांना वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, याविषयी सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आत्राम यांनी नगरपालिकेकडे निवेदन सादर केले आहे. पावसाळ्यात नदीला मुबलक पाणी असतानाही शहरात टंचाई जाणवत असल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

पुष्पा आत्राम यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, वणीकरांना संपूर्ण वर्षभर अशुद्ध पाणीपुरवठा केला जातो. पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागला. नदी व जलस्रोतांमध्ये पुरेसे पाणी असतानाही योग्य नियोजनाअभावी शहरात टंचाई निर्माण होते. तीन ते चार दिवसानंतर वणीकरांना पाणी पुरवठा होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांनी नगरपालिकेला दिलेल्या निवेदनात पाणीपुरवठा यंत्रणा तातडीने सुधारावी, शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करून नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे. तसेच पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांचा संताप वाढेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

Comments are closed.