राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शहरात मोफत टॅकरने पाणी पुरवठा

0

गिरीश कुबडे, वणी: शहरात या वर्षी मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागात पाणी मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहे. लोकांची सध्या पाण्यासाठी वनवन भटकंती चालू आहे. शहरातील वाढत्या पाणी टंचाईवर काही प्रमाणात का होईना दूर करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्वात शहरातल्या प्रत्येक घरातपर्यत पाणी पोहचविण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ टिळक चौकातून करण्यात आला. शहरात रोज दिवसाला ४ ते ५ ट्रिप टॅकरने वाटप करण्यात निर्णय घेण्यात आला आणि बाहेर गावावरून येणाऱ्या शहरात प्रत्येक नागरिकाला शुद्ध आरोचे पाणी पिण्यासाठी मिळावे म्हणून चौका – चौकात पाणपोई सुद्धा लावल्या जाणार आहे. असे या यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाला डॉ.महेंद्र लोढा, राजा बिलोरीया,जयसिंग गोहोकार, रामकृष्ण वैद्य, सिद्दीकी, संगीता खटोड, विजया आगबत्तलवार इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.