वणी नगरपरिषद निवडणुकीसाठी मनसे-शिवसेना (उबाठा) एकसाथ

 दोन्ही पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची एकत्र मुलाखत, नव्या राजकीय पर्वाची सुरुवात !

बहुगुणी डेस्क, वणी: आगामी वणी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी इच्छुक उमेदवारांची एकत्र मुलाखत घेऊन एका नव्या राजकीय पर्वाकडे वाटचाल सुरु केली आहे. 10 नोव्हेंबर रोजी वणी येथे शिवसेनेतर्फे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाकरिता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतींची प्रक्रिया वरोरा रोडवरील जगन्नाथ महाराज मंदिर परिसरातील सभागृहात दुपारी 12 वाजता सुरू झाली. शिवसेना (उद्धव गट) चे आमदार संजय देरकर व मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थित या मुलाखती झाल्या. या मुलाखत कार्यक्रमात 250 पेक्षा अधिक इच्छुकांनी सहभाग घेतला. एकत्र मुलाखत घेऊन शिवसेना-मनसेने आगामी निवडणूक एकत्रीत लढण्याचे स्पष्ट केले आहे.  

यावेळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमुखाने जाहीर केले की, “ही युती वणी नगरपरिषदेत भगवा झेंडा फडकवण्यासाठी आणि ठाकरेंच्या विचारांना एकत्र आणण्यासाठी आहे.” आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी हातमिळवणी करून एका नव्या राजकीय पर्वाची सुरुवात केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

बैठकीस मनसे महिला सेनेच्या राज्य उपाध्यक्षा अलका टेकाम, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाडे, मनसे महिला जिल्हाध्यक्षा अर्चना बोदाडकर, विधानसभा संघटक सुनिल कातकडे, उपजिल्हाप्रमुख दीपक कोकास, मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, जिल्हा समन्वयक सुधीर थेरे, तसेच माजी नगराध्यक्षा प्रिया लभाणे यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर
वणीतील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संचिता नगराळे यांचे नाव शिवसेनेतर्फे आधीच निश्चित करण्यात आले आहे. या नावाला मनसेनेही पाठिंबा दिल्याचे कळतये. सध्या विद्यमान आमदार शिवसेनेचे (उबाठा) असल्याने शहरात शिवसैनिकांमध्ये उर्जा संचारली आहे. तर शहरात मनसेकडे ऍक्टिव्ह युवा कार्यकर्त्यांची फौज आहे. त्याचा शिवसेनेला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी फायदा होईल असे मानले जात आहे. तर नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी कोणता फॉर्मुला ठरला आहे, याबाबत अधिकृतरित्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मुलाखत कार्यक्रमाच्या वेळी अजिंक्य शेंडे, गोविंदराव थेरे, अंकुश बोढे, राजू तुराणकर, बोदाडकर, बंडू येसेकर, विनोद ढुमने, संतोष कुचनकार, प्रकाश पिंपळकर, मनीष बत्रा, सचिन मते, राकेश वैद्य, सविता आवारी, ज्योती मेश्राम, मेघा तांबेकर, मयुर गेडाम, शंकर पिंपळकर, शम्स सिद्दीकी, राहुल पानघाटे, लक्की सोमकुंवर, अहमद रंगरेज, आशिष चतुर, अमर सातपुते, विकी कळसकर, सूरज पळसकर, राजीव पाटिल, अजय चन्ने, स्वप्नील ताजने, शत्रुघ्न मालेकर केळकर, मोरेश्वर उज्वळकर, नितिन शिरभाते, शंकर देरकर, फैजल खान, अल्ताफ शेख, मोहम्मद अन्सार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Comments are closed.