अखेरच्या दिवशी नगरसेवकासाठी 103 तर नगराध्यक्षपदासाठी 5 नामनिर्देशन

29 जागांसाठी 200 पेक्षा अधिक अर्ज, तर नगराध्यक्षपदासाठी 10 अर्ज

बहुगुणी डेस्क, वणी: सोमवारी नामनिर्देशन अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिवस होता. सोमवारी तब्बल 103 उमेदवारांनी अर्ज सादर केला. तर नगराध्यक्षपदासाठी 5 नामनिर्देशन अर्ज सादर करण्यात आले.नगराध्यक्ष पदासाठी पुष्पा कवडू कुळसंगे आप, पुष्पाताई पुंडलीक आत्राम वंचित बहुजन आघाडी, संगिता भास्कर मेश्राम भाजप, उमा विठ्ठलराव राजगडकर अपक्ष, शेख काजल इस्माईल अखतर राष्ट्रवादी शरद पवार यांनी नामनिर्देशन सादर केले. आतापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एकूण 10 नामनिर्देशन तर नगरसेवक पदासाठी 201 अर्ज दाखल झाले आहेत. यात काहींनी पक्षाचे डमी उमेदवार तर काहींनी अपक्ष व पक्षाचे असे दोन्ही फॉर्म भरले. काहींनी एकापेक्षा अधिक फॉर्म भरले आहेत. आज अर्जाची छानणी प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर अंतिम यादी सादर होणार आहे. तर दिनांक 19 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या काळात उमेदवारी मागे घेता येणार आहे. 26 नोव्हेंबर रोजी अपक्षांना चिन्ह वाटप होणार आहे. 

कुणी भरला अर्ज –
प्रभाग क्रमांक 1 ब – प्रशांत सुदाम फाळके आम आदमी पार्टी, नितीन शंकरराव चहाणकर अपक्ष, नितीन शंकरराव चहाणकर भारतीय जनता पार्टी, प्रकाश जनार्धन पिंपळकर अपक्ष,
प्रभाग क्रमांक 2 ब – राजू किसन तुराणकर शिवसेना (उ. बा. ठा.), धनराज रमेशराव भोंगळे अपक्ष,
प्रभाग 3 अ – अश्विनी विनोद खापणे शिवसेना (उ. बा .ठा),
प्रभाग क्रमांक 3 ब – प्रदीप दामोदर सुंकरवार आम आदमी पार्टी, अभिजित अरुण सातोकर शिवसेना (उ.बा .ठा), अनिकेत अनिल चामाटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)
प्रभाग क्रमांक 4 अ – मेघा सुधीर पेटकर शिवसेना (उ. बा.ठा) , ललिता भाऊराव तेलतुंबडे वंचित बहुजन आघाडी,
प्रभाग क्रमांक 4 ब- धीरज गणेश भोयर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, नारायण शाहुजी गोडे आम आदमी पार्टी, सागर अशोकराव मुने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, धीरज गणेश भोयर अपक्ष, वसंता विठ्ठल गायकवाड वंचित बहुजन आघाडी

प्रभाग क्रमांक 5 ब – किशोर काशीनाथ गिरडकर आम आदमी पार्टी , कपिल भास्कर मेश्राम अपक्ष, गौतम दिलीप जीवने काँग्रेस,
प्रभाग क्रमांक 6 अ – रूपाली नारायणराव लोहकरे वंचित बहुजन आघाडी, प्रिया अनुप काटकर अपक्ष, सुनीता गणेश सोनकर अपक्ष, गौतमी अजय खोब्रागडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार,
प्रभाग क्रमांक 6 ब – सिद्धार्थ दिलीप मून वंचित बहुजन आघाडी, महेश गंगाधर टिपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, मुकुंदा विद्याधार कीटकुले अपक्ष , प्रमोद गोकुळ लोणारे अपक्ष , गंगासिंग गुरुदयालसिंग चव्हाण अपक्ष,
प्रभाग क्रमांक 7 अ – शेख सिमरन शेख असिफ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शेख रुकसाना परवीन इकबाल राष्ट्रीय काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, पूजा वासुदेव बुरांडे अपक्ष, छाया किशोर मृत्यलवार अपक्ष 
प्रभाग 7 ब – प्रमोद मारोतराव क्षीरसागर अपक्ष, अभिजीत वसंत सोनटक्के काँग्रेस, जितेंद्र किसनराव शिरभाते राष्ट्रवादी शरद पवार, सचिन अरुणराव पाटील शिवसेना (उबाठा), सचिन अरुणराव पाटील अपक्ष, अतुल झाबाजी घोटकर अपक्ष, दिलीप हरिदास वनकर आम आदमी पार्टी

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्रभाग 8 अ – रुपाली संजय कुरेकार अपक्ष, सारिका पवन सिद्धमशेट्टीवार काँग्रेस
प्रभाग 8 ब – हुसैन आसिम हुसैन मंजुर एमआयएम, शेख अब्दुल रज्जाक अपक्ष, प्रशांत विठ्ठलराव कापसे राष्ट्रवादी शरद पवार
प्रभाग 9 ब – प्रवीण प्रभाकर बलकी भाजप, राजेश मारोती खाडे शिवसेना, अ. अफिज सत्तार अपक्ष, समिश नामदेव इचवे आप, साकीब अहेमद खान एमआयएम, अंकुश चिंतामन बोढे भाजप
प्रभाग 10 अ – स खैरनबी कादर प्रहार जनशक्ती पक्ष, खान सुरैय्या बानो युसुफ खान एमआयएम
प्रभाग 10 ब – खान रेहान युसुफ
प्रभाग 11 अ –अंकिता ज्ञानेश्वर कुळसंगे काँग्रेस, पुष्पा कवडू कुळसंगे आप, ज्योती मधूकर मेश्राम राष्ट्रवादी शरद पवार, पुष्पाताई पुंडलीक आत्राम वंचित बहुजन आघाडी
प्रभाग 11 ब – अशोल गणपत बिलोरिया काँग्रेस, मिलिंद राजू बावणे अपक्ष, गणेश रघुनाथ चुरे अपक्ष, सुहास दादाजी नांदेकर भाजप, स्मिता सुहास नांदेकर भाजप, अजय विठ्ठलराव चन्ने अपक्ष, हरिश किसनराव मोहबिया भाजप, राजेश वामनराव डफ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, प्रशांत शामराव नक्षीणे अपक्ष

प्रभाग 12 अ – जयश्री संतोष इनमुलवार शिवसेना, शीला रविद्र मेश्राम काँग्रेस, अफसाना काजी मुस्तकोद्दीन अपक्ष, अक्षता कोकाजी चव्हाण अपक्ष,
प्रभाग 12 ब – आकाश सुधाकर उईके काँग्रेस, विजय रमेश मेश्राम अपक्ष, अविनाश सुनील उईके वंचित बहुजन आघाडी, बबन रामचंद्र केळकर अपक्ष, नरेंद्र गणपत गेडाम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार,
प्रभाग 13 अ – अलका मारोती मोवाडे काँग्रेस
प्रभाग 13 ब – रहेमान सैफूर मोबिन काँग्रेस, पुरण कुंदणगीर पवार प्रहार जनशक्ती पार्टी, दादाजी लटारी पोटे आप, निखिल धर्मा ढुरके अपक्ष,
प्रभाग 14 अ –माधुरी महेश साळुंके शिवसेना (उबाठा), आशाताई पांडुरंग टोंगे काँग्रेस, हेमलता महेश कुचेवार शिवसेना, निलीमा सचिन गेडाम अपक्ष, अफसाना मुश्ताकोद्दीन काजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, ज्योत्स्ना अरविंद पुसनाके अपक्ष, वंदना महेश पारखी अपक्ष,
प्रभाग 14 ब रंगरेज गुलाम रसूल वली शिवसेना (उबाठा), सुभाष बाबुलाल वाघडकर भाजप,
प्रभाग 14 क – हिना अहेमद शकील शिवसेना, माया मारोती ढुरके राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, माधुरी महेश साळुंखे शिवसेना (उबाठा)

जाणून घ्या रविवारी कुणी कुठून भरलेत अर्ज

रविवार ठरला गर्दीचा, नगराध्यक्षासाठी 4 तर नगरसेवकांसाठी 94 नामनिर्देशन पत्र

Comments are closed.