रविवार ठरला गर्दीचा, नगराध्यक्षासाठी 4 तर नगरसेवकांसाठी 94 नामनिर्देशन पत्र

जाणून घ्या कोणी कुठून आणि कोणत्या पक्षातर्फे भरला अर्ज

बहुगुणी डेस्क, वणी: रविवारचा दिवस नामनिर्देशन भरण्याचा दिवस ठरला. रविवारी तब्बल 94 उमेदवारांनी अर्ज सादर केला. तर 4 नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन अर्ज सादर करण्यात आले. विशेष म्हणजे काहींनी पक्षाचे तिकीट मिळेल या आशेवर पक्षातर्फे व अपक्ष असे दोन्ही अर्ज सादर केले. ज्यांना एबी फॉर्म मिळणार तोच पक्षाचा अधिकृत उमेदवार राहणार.  नगराध्यक्ष पदासाठी संचिता विजय नगराळे शिवसेना (उबाठा), भारती संतोष पेंदोर अपक्ष, विद्या खेमराज आत्राम भाजप, पायल यशवंत तोडसाम शिवसेना यांनी अर्ज भरला. आज शेवटची तारीख असल्याने उमेदवारांची जम्बो गर्दी राहण्याची चिन्ह आहे.

कुणी भरला अर्ज –
प्रभाग 1 अ – वसुधा अनिल ढगे शिवसेना, प्रणाली गणेश देऊळकर शिवसेना (उबाठा), मीनाक्षी शैलेश जुनघरे भाजप
प्रभाग 1 ब – अजय पांडुरंग धोबे शिवसेना (उबाठा), कैलास तुकारामजी बोबडे शिवसेना, अरुणभाऊ बालाजी राजूरकर भाजप, उमाकांत महादेव जोगी (भाजप)
प्रभाग 2 अ – रिता महेश पहापळे भाजप, मंजुषा मंगशे झाडे शिवसेना, पुष्पा मधूकर भोगेकर अपक्ष
प्रभाग 2 ब– वैभव अनिल मांडवकर शिवसेना, आशिष ज्ञानेश्वर डंभारे भाजप
प्रभाग 3 अ – ठेंगणे शुभांगी रविंद्र शिवसेना, वैशाली विनोद वातीले भाजप
प्रभाग 3 ब – लक्ष्मण महादेव उरकुडे भाजप, जगन पुरुषोत्त्म खंडाळकर शिवसेना

प्रभाग 4 अ – स्नेहा प्रतिक खैरे शिवसेना, साधना किसन देठे शिवसेना (उबाठा), अर्जना संजय पुनवटकर भाजप
प्रभाग 4 ब – निलेश मधुकर परगंटीवार शिवसेना, प्रवीण शेषराव ढोके शिवसेना (उबाठा), अनिल नानाजी ताजणे अपक्ष
प्रभाग 5 अ – सोनाली प्रशांत निमकर भाजप, गीता सचिन पडोळे शिवसेना, अर्जना सुभाष ताजणे शिवसेना (उबाठा)
प्रभाग 5 ब – गौतम दिलीप जीवने शिवसेना (उबाठा), रितीक लक्ष्मण मामीडवार भाजप, रामेश्वर शुक्राचार्य लोणारे वंचित बहुजन आघाडी, संदीप मुरलीधर खोब्रागडे शिवसेना,
प्रभाग 6 अ – करुणा रविंद्र कांबळे काँग्रेस, करुणा रविंद्र कांबळे – अपक्ष, प्रणोती हेमंत बांगडे शिवसेना, धम्मदीन हरीष पाते भाजप, शुभांगी अमोल बांगडे शिवसेना, गौतमी अजय खोब्रागडे शिवसेना

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्रभाग 6 ब – मुकुंदा विद्याधर किटकुले शिवसेना, अनिकेत अनिल बदखल शिवसेना (उबाठा), विलास मारोतराव डवरे भाजप, वर्षा अनिल सातपुते शिवसेना,
प्रभाग 7 अ – उषा नथ्थू डुकरे भाजप, निशा किशोर उपरे शिवसेना, प्रीती देवराव बीडकर शिवसेना,
प्रभाग 7 ब – नीलेश विठ्ठल होले शिवसेना, नितीन गोपाल धाबेकर भाजप, जितेंद्र किसनराव शिरभाते अपक्ष, राजेश बापुराव पारधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार,
प्रभाग 8 अ – प्रमिला मनोज चौधरी भाजप, देवयानी संजय सूर शिवसेना
प्रभाग 8 ब – निखिल प्रभाकर डवरे अपक्ष, सागर मारोती पोडचलवार अपक्ष, सुधीर रिमदेव थेरे शिवसेना (उबाठा), कुणाल संजय सोमशेट्टीवार भाजप, राजू नागोराव रिंगोले शिवसेना, प्रशांत विठ्ठलवार कापसे अपक्ष,

प्रभाग 9 अ – किरण शंकर देरकर शिवसेना (उबाठा), इंदिरा सुधाकर पारखी शिवसेना, भारती श्रीकृष्ण बदखल भाजप,
प्रभाग 9 ब – शत्रुघ्न मारोती मालेकर शिवसेना (उबाठा), अतिक इनामुर्महिम सैयद अपक्ष, हसनैन यादवराव शेख शिवसेना, गोविंदा सुरेश दुर्गे वंचित बहुजन आघाडी, भारत शंकर कुमरे काँग्रेस, भारत शंकर कुमरे अपक्ष,
प्रभाग 10 अ – आरती गिरीष वांढरे भाजप, एकता शिवराज पेचे शिवसेना, मिनाक्षी राजू साठे शिवसेना, संमिता रामेश्वर मांढरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, हर्षाली कैलास पचारे शिवसेना (उबाठा)
प्रभाग 10 ब – अनिल लाभचंद चिंडालिया भाजप, निखिल अनिल वैरागडे अपक्ष, अक्षय राजेंद्रकुमार बोथरा शिवसेना, संजय रतनप्रकाश पुरावार शिवसेना (उबाठा),
प्रभाग 11 अ – सोनाली नितीन आत्राम शिवसेना, रेखा विलास कोवे भाजप
प्रभाग 11 ब – लवलेश किशनलाल लाल भाजप, शेख मोहम्मद अल्ताफ रहिम शिवसेना,

प्रभाग 12 अ – अक्षता कोकाजी चव्हाण शिवसेना, पूजा रविंद्र रामगिरवार भाजप, सोनाली अमृत पुरी शिवसेना
प्रभाग 12 ब – अमोल विजय चांदेकर अपक्ष, हरिओम प्रकाश गेडाम शिवसेना, मनोज कवडू सिडाम भाजप, हरिदास धोंडुजी गेडाम अपक्ष,
प्रभाग 13 अ – ललिता मारोती भेदोडकर भाजप, किरण मुरलीधर कुत्तरमारे शिवसेना
प्रभाग 13 ब – धर्मेंद्र नामदेव काकडे शिवसेना, प्रवीण अशोक डाहुले अपक्ष, राजेश्वर सुरेश चापडे भाजप
प्रभाग 14 अ – मनिषा राजू गव्हाणे भाजप, तुळसा प्रवीण पेंदोर शिवसेना
प्रभाग 14 ब – दिपक मारोती मोरे अपक्ष, संतोष पुंडलिक पारखी शिवसेना, दिपक मारोती मोरे भाजप
प्रभाग 14 क – अर्चना शंकरराव झिलपे भाजप

(कोणाला कोणत्याही पक्षातर्फे अर्ज दाखल करता येतो. मात्र ज्यांचा एबी फॉर्म जोडला असेल त्यांचाच अर्ज हा पक्षाचा अधिकृत मानला जाईल.)

Comments are closed.