पाटण ठाणेदाराला वरिष्ठ अधिकारी व राजकीय लोकांचे पाठबळ
सुशील ओझा, झरी: पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारू विक्री, वरली मटका, जनावर तस्करी व अवैध प्रवासी वाहतूक सुरु असल्याचे उघड होऊनही ठाणेदारावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने पाणी कुठे तरी मुरत असल्याचे बोलले जात आहे. नुकतेच उपविभागीय पोलीस अधिकारी वणी व त्यांच्या पथकाने माथार्जुन सुर्दापूर मार्गावर कत्तलीसाठी तेलंगानात जाणारे ४१ जनावरे पकडून ९ जणांवर कार्यवाही केली होती. तर शिवसेनेचे पदाधिकारी दयाकर गेडाम यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठांना वरली मटका सुरु असल्याची माहिती देऊन झरी येथील वरली मटक्यावर धाड टाकायला लावली होती. या धाडीत पकडलेल्या आरोपी सोबत पाटणचे ठाणेदार बसस्टँड जवळील हॉटेलमध्ये चहा पित होते. यावरून दयाकर गेडाम व ठाणेदार लष्करे यांच्यात वाद होऊन मारपिट झाली होती.
पाटण पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या एका बंद जिनिंगमध्ये हायप्रोफाईल जुगार देखील चालू होता. या जुगारावर जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी पांढरकवडाचे डी वाय एस पी कोळी व तेथीलच ठाणेदार असलम खान यांना धाड टाकण्यास सांगितले होते. यावरून सुरु असलेल्या जुगारावर रात्री १२ वाजता दरम्यान धाड टाकण्यात आली व त्यात ११ चारचाकी नगदी रक्कम असा ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील आरोपी कर्नाटक, तेलंगणा, आदिलाबाद, निजामाबाद व इतर भागातील होते.
पाटण परिसरातून तेलंगानात जनावर तस्करीला ठाण्यातील काही कर्मचारी साथ देत असल्याची कबुली ठाणेदार यांनी मीडिया समोर दिली. पाटण पोलीस यांनी यापूर्वी हि ४० ते ४५ जनावरे पकडली व ती जनावरे गौरक्षण किंवा कोडवाड्यात न टाकता ८ ते १० दिवस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आले होते.
जनावर तस्करीच्या टोळीशी काही पोलीस कर्मचारी यांचे समंध असल्याने दिग्रस येथील वननाक्यावर महिला पोलीस कर्मचारी जनावरांच्या चारचाकी गाड्या तेलांगण्यात जाण्याकरिता पास करून गाडी प्रमाणे वसुली करीत असल्याची माहिती आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांना साथ देणारे वननाक्यावरील कर्मचारी सुद्धा आहे. सदर वनकर्मचारी हा जनावर भरून आलेल्या गाडीची नोंद घेत नसल्याची माहिती आहे. पोलीस व नाक्यावरील वनविभागचा कर्मचारी यांच्या मिलीभगतमुळे जनावरांची तस्करी होत आहे. गाडीची नोंद न घेण्याकरिता प्रत्येक चारचाकी गाडीवाल्यांकडून १ हजार मिळत असल्याचीही माहिती आहे.
सदर जनावर तस्करी बाबत काही पोलीस अधिकारी याना विचारणा केली असता तुम्ही माहिती द्या आम्ही कार्यवाही करतो असे बोलतात ज्यामुळे जनावर तस्करी रोखण्यासाठी पोलीस किती जागृत आहे हे दिसून पडते. जनावर तस्करी करिता पोलीस केव्हा जागे होणार असा प्रश्न जागरूक नागरिक करीत आहे वणी बहुगुणींने वणी उपविभागातून होणारी जनावर तस्करीबाबत, जनावरे जाण्याचे मार्ग, तस्करांचे नावे, बैल बाजार भरण्याचे ठिकाण, गावांची नावे सर्व प्रकाशित करूनही माहिती सांगा आम्ही कार्यवाही करतो असे अधिकारी म्हणतात. पाटण ठाणे अंतर्गत जनावर तस्करी, वरली मटका, जुगार सुरु नसल्याचे सांगण्यात येते मग वरील एवढ्या कार्यवाही हे पुरावे नाही का ? असाही प्रश्न नागरिक करीत आहे.