बहुगुणी डेस्क, वणी : वणी पोलीस स्टेशन हद्दीतील रांगणा येथे एका 35 वर्षीय विवाहित इसमाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृताचे नाव राहुल आनंदराव दुर्गे (वय 35, रा. रांगणा) असे असून शनिवारी सकाळी त्यांनी आपल्या राहत्या घरी विषारी औषध घेतले. तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, वणी येथे सकाळी सुमारे 10.30 वाजता दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती वणी पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास पोलीस स्टेशनतर्फे सुरू आहे.

Comments are closed.