शिक्षकाने दान करून उभारली डिजिटल क्लासरूम
गिरीष कुबडे, वणी: वणी येथील लोकमान्य बापूजी अणे नगर परिषद शाळा क्र.४ शाळेतील मुख्याध्यापक किशोर परसावार यांनी दीपक टॉकीज परिसरातील गोर- गरीब मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणून त्यांचे जिवनस्तर उंचावण्याकरिता डिजियल क्लासरूम उभारली आहे. यासाठी त्यांनी ४५ हजार रुपयांची मदत केली आहे. वणी शहराचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या डिजीटल क्लासरूमचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्षांनी मुख्याध्यापकांच्या निस्वार्थ कार्याची प्रशंसा केली व वाढदिवसानिमित्त दिलेल्या भेटीबद्दल आभार मानले.
याप्रसंगी शिक्षण सभापती आरतीताई वांढरे, जलपूर्ती सभापती संतोष पारखी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोहरराव महापुरे, शाळेचे मुख्याध्यापक किशोर परसावार, पत्रकार व समितीचे सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षक दिलीप कोरपेनवार, प्रमिला अवचट, विद्या ढेंगळे, लता ठमके, अविनाश पालवे, संजय पिदूरकर, विनोद चव्हाण, संतोष शिंदे, प्रभाकर ब्रम्हटेके, किरण जगताप, प्रीती घुगरे, शांताबाई दुर्गे, इंदुबाई मालेकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाते संचालन अविनाश पालवे यांनी केले तर आभार प्रभाकर ब्रम्हटेके यांनी मानले.
गेल्या वर्षी या शाळेला मुख्याध्यापक किशोर परसावार यांनी मुलांना बसण्यासाठी ३७ हजार रुपये दान करून डेस्क बेंच व शालेय पोषण आहाराकरिता आईच्या स्म्रुती प्रित्यर्थ १६ हजार रुपयांचे भांडे उपलब्ध करून दिले होते.