आगीत प्रवासी वाहन जळून भस्मसात

0

विवेक तोटेवार, वणी: गुरुवारी मध्यरात्री विठ्ठलवाडी परिसरात एका प्रवासी वाहनाला अचानक आग लागली. या आगीत हे वाहन संपूर्ण जळून खाक झाले. ही आग इतकी भीषण होती की या वाहनाच्या बाजूला असलेल्या कारला देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वाहन चालक आनंद गोवारदिपे हा विठ्ठलवाडी परिसरातील गुरूदेव सोसायटीमध्ये राहतो. संध्याकाळी त्याने प्रवासी वाहन (MH26-AF1403) त्याच्या घरासमोर ठेवले. मात्र मध्यरात्री या वाहनाने अचानक पेट घेतला. वाहनाला आग लागल्याचे दिसताच शेजारील मंडळी गोळा झाली आणि त्यांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. आगीने रौद्ररुप धारण केले होते. या आगीत हे वाहन संपूर्ण भस्म झाले.

प्रवासी वाहनाच्या शेजारीच जेनेकर यांची कार उभी होती. वाहन त्यांच्या कारला धडकले. यात कारला देखील आग लागली. मात्र तोपर्यंत शेजा-यांना ही बाब लक्षात आली होती. जेनेकर यांनी लगेच ती कार घटनास्थळापासून दूर नेली त्यामुळे त्यांची कार या आगीतून वाचली. आग लागण्याचे कारण अद्याप कळालेले नाही. मात्र यात प्रवासी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे…

लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ…

 

Leave A Reply

Your email address will not be published.