प्रभाग क्र. 5 मध्ये भाजपचा झंझावात – परंपरागत गड पुन्हा रंगला उत्साहात
सोनाली निमकर, रितिक मामिडवार व विद्या आत्राम यांच्या प्रचारार्थ रॅलीत उसळला जनसागर
बहुगुणी डेस्क, वणी: दिनांक 22 नोव्हेंबर रोजी भाजपची प्रभाग क्रमांक 5 मध्ये भव्य रॅली निघाली. सौ. सोनाली प्रशांत निमकर (5 अ), रितिक लक्ष्मण मामिडवार (5 ब) तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या खेमराज आत्राम यांच्या प्रचारार्थ भाजपने संपूर्ण प्रभाग पिंजून काढला. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्त्वात निघालेल्या या रॅलीने मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले. ढोलताशांच्या गजरात निघालेली रॅली जणू उत्सवाचा माहोल निर्माण करत होती; तर घोषणांनी वातावरण भारून गेले.
स्थानिक मंदिरात दर्शन घेऊन व नारळ फोडून प्रचाराला सुरुवात झाली. रॅलीत मा. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार हे नागरिकांशी थेट संवाद साधत होते. तेली फैल, ग्रामीण रुग्णालय जवळ, भीमनगर, दामले नगर, शेतकरी मंदिर रोड इत्यादी भागात ही रॅली फिरली. रॅलीत ढोलताशांच्या गजरासोबतच घोषणाबाजीचा जोरदार आवाज घुमत होता. “भाजप विजय होणारच” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी वातावरण भारून टाकले. रॅलीत भाजपच्या स्कार्फ घातलेल्या पोषाखाने वातावरण भगवेमय झाले.
रॅलीत प्रत्येक घरासमोर उमेदवारांचे स्वागत होत होते; कुठे औक्षण तर कुठे फुलांच्या उधळणीने त्यांचे स्वागत करण्यात आले. सौ. सोनाली प्रशांत निमकर, रितिक लक्ष्मण मामिडवार व विद्या आत्राम या नागरिकांशी मुक्तपणे संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेत होत्या. युवकांनी उत्साहाने घोषणाबाजी करत उमेदवारांना पाठिंबा दिला.

प्रभाग 5 माझे कुटुंब
प्रभाग क्रमांक 5 हा माझ्या कुटुंबासारखा आहे. येथील प्रत्येक नागरिकाशी माझे नाते आत्मीयतेचे आहे. त्यांच्या विश्वासामुळेच आम्ही विकासाची कामे पूर्ण करू शकलो. रॅलीत नागरिकांचा उत्साह पाहून माझे मन भरून आले. या जनतेच्या प्रेमाची परतफेड आम्ही विकासाच्या रूपाने करणार आहोत. जनतेच्या आशीर्वादानेच आम्ही आदर्श प्रभाग घडवू. अशी प्रतिक्रिया रॅलीच्या वेळी मा. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिली.
यावेळी भाजपा प्रदेश किसान मोर्चा उपाध्यक्ष दिनकर पावडे, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अंकुश बोढे, भाजपा वणी शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी, भाजपा जिल्हा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्रेयस हरणे, भाजपा शहर उपाध्यक्ष विलास निमकर तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंस्टाग्रामसाठी येथे क्लिक करा….



Comments are closed.