श्यामा (मिस्त्री) संगमवार यांचे अल्पशा आजाराने निधन
आज दुपारी राजूर कॉलरी येथे अंत्यसंस्कार
बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरात लेथ मशीणवाले म्हणून परिचित असलेले श्यामा (मिस्त्री) उर्फ श्यामा नरेश संगमवार (वय 40, रा. राजूर कॉलरी, ता. वणी, जि. यवतमाळ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मागील काही दिवसांपूर्वी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना वर्धा येथील सावंगी (मेघे) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी रात्री उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने वणी व राजूर कॉलरी येथे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा आप्तपरिवार आहे. आज सकाळी 11 वाजता त्यांचे पार्थिव राजूर कॉलरी येथे पोहोचणार असून त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Comments are closed.