दमदार प्रचार, जोमदार रॅली व जाहीर सभा याने मतदारांमध्ये उसळली लाट

विद्या खेमराज आत्राम यांनी घेतली आघाडी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

बहुगुणी डेस्क, वणी: निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात घेण्यात आलेली हजारोंची रॅली व महसूल मंत्री चंद्रशेखऱ बावनकुळे यांच्या प्रचार सभेने मतदारांमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. विद्या खेमराज आत्राम यांची लाट उसळली आहे. प्रचार सुरु होण्याच्या आधीपासून गृहभेट, कॉर्नर सभा याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला आहे. त्यातच अंतिम टप्प्यात निघालेल्या रॅली व प्रचार सभेने कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. परीणामी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना आणखी बळकटी मिळाली आहे.

आज प्रचाराचा अंतिम दिवस आहे. संपूर्ण प्रचाराचा कालावधीतच भाजपने प्रचारात आघाडीवर राहिली. रोज सकाळी बैठकीचे सत्र, त्यानंतर प्रभागात रॅली व कॉर्नरसभा याने भाजपचा प्रचार शिस्तबद्ध पद्धतीने चालला. प्रत्येक उमेदवार निवडून आणायचा या ध्येयाने भाजपने आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्त्वात प्रचार केला. शहराध्यक्ष ऍड निलेश चौधरी यांनी संपूर्ण कॅम्पेनचे व्यवस्थापन केले. ज्येष्ठ नेते संपूर्ण कालावधी सोबत राहिले. विविध सेलचे पदाधिकारी प्रत्येक प्रभागात पायाला भिंगरी बांधून फिरले. त्याचा एकत्रीत परिणाम आता अंतिम टप्प्यात दिसून येत आहे.

प्रत्येक घर टारगेट, प्रत्येक नगरसेवकाच्या विजयासाठी नियोजन
भाजपने या निवडणुकीत प्रत्येक घर, प्रत्येक मतदार टारगेटवर ठेवला. प्रचाराचा व निवडणुकीचा दीर्घ अनुभव असलेल्या व्यक्तींची प्रभागाचा प्रचार प्रभारी म्हणून नियुक्ती केली. त्यांना दोन सहकारी दिले. तसेच वार्डातील कार्यकर्ते हे त्यांच्या मदतीला आहेच. त्यामुळे भाजपचे प्रत्येक घर टारगेटवर राहिले. ज्या वार्डात अतितटीची लढत आहे. अशा वार्डात प्रचाराचा जोर वाढवला. कॉर्नर सभा, रॅली याने प्रभागात संपर्क वाढवला. तसेच प्रत्येक घर निवडून त्यासाठी वेगळी यंत्रणा कामी लावली. अशी माहिती शहराध्यक्ष ऍड निलेश चौधरी यांनी दिली. या शिस्तबद्ध पद्धतीने प्रचार केल्याने कार्यकर्त्यांचाही उत्साह शिगेला पोहोचला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मंगळवारी होणाऱ्या मतदानाच्या तारखेला आता अवघे काही तास शिल्लक असून, भाजपचा संपूर्ण प्रचार व नियोजन यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. दहा वर्षांच्या विकासकामांचा ठोस दाखला देत, विविध पॉकेट्स टारगेट करून आणि एकजुटीने मोट बांधून चाललेल्या या मोहिमेने मतदारांच्या मनात स्थान केले आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. विद्या खेमराज आत्राम तसेच 29 नगरसेवक यांना मोठी आघाडी मिळवून दिली आहे.

कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांनी आणि जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने हा प्रचार केवळ निवडणुकीचा भाग नव्हता, तर वणीच्या प्रगतीची एक ठाम वचनबद्धता ठरली. आता सर्व तयारी पूर्ण झाली असून मंगळवारी होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदारांच्या निर्णयानेच या दमदार प्रचाराला अंतिम शिक्कामोर्तब मिळणार आहे.

Comments are closed.