मा. आ. विश्वास नांदेकर यांना शोकाकुल वातावरणात निरोप

अंत्ययात्रेला जनसागर....राजकीय, सामाजिक मान्यवरांची उपस्थिती

बहुगुणी डेस्क, वणी: शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी त्यांच्या मूळगावी पठारपूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी रात्री मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सोमवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव वणीत आणण्यात आले. रविनगर येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

अंत्ययात्रेदरम्यान वणी शहरात नागरिकांनी रस्त्यावर उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर ही अंत्ययात्रा पठारपूरकडे रवाना झाली. गावागावांत अंत्ययात्रा पोहोचताच शोकाकुल नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून आदरांजली वाहिली. कायर येथील राजे संभाजी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी व नागरिकांनी अंत्यदर्शन घेतले. तेथून अंत्ययात्रा पठारपूर येथे पोहोचली. तेथे विश्वास नांदेकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पुतण्याने विशाल विनायक नांदेकर यांनी भडाग्नी दिला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या वेळी पालकमंत्री संजय राठोड, खासदार प्रतिभा धानोरकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार संजय देरकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, वामनराव कासावार, सुदर्शन निमकर, मनसेचे नेते राजू उंबरकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे, वणी नगराध्यक्ष विद्या आत्राम, अॅड. देवीदास काळे, संजय खाडे, पुरुषोत्तम आवारी, विजय चोरडिया, संजय पिंपळशेंडे, संजय निखाडे, गणपत लेडांगे, सुधाकर गोरे, सचिन मत्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments are closed.