वनिता समाजाची महिलांसाठी विशेष कार्यशाळा
सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः किशोरवयीन मुलींपासून अगदी प्रौढ स्त्रियांपर्यंत अनेकींना समाजातील विविध आघातांपासून बचाव करणे आवश्यक असते. किशोरवयीन तरुणींच्या बदलत्या भावविश्वात काही गोष्टी अपघातांनी घडतात. या वयात काय काळजी घ्यावी, स्त्रियांनी आपल्या बचावाकरिता काय खबरदारी घ्यावी या अशा अनेक संबंधित विषयांवर वनिता समाजाने समुपदेशन व मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली आहे.
‘‘नाही कसं म्हणू तुला?’’ या शीर्षकांतर्गत ही कार्यशाळा सोमवार दिनांक 9 एप्रिल 2018 रोजी सायंकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत श्री जैताई देवस्थान सभागृहात होणार आहे. पुणे येथील समुपदेशक व मार्गदर्शक श्रीकांत पोहनकर या कार्यशाळेला मार्गदर्शन करतील. स्वसंरक्षणाच्या अत्यंत सोप्या युक्त्या या कार्यशाळेत सांगितल्या जातील. काही प्रात्यक्षिकेही करून दाखविली जातील. ही मोफत कार्यशाळा फक्त महिला व युवतींसाठी असून याचा लाभ घेण्याची विनंती वनिता समाजाच्या वतीने अध्यक्षा भारती सरपटवार यांनी केली आहे.