विवेक तोटेवार, वणी: वणी परिसरात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू व गुटखा तस्करीला अभय दिले जात असल्याच्या आरोप करीत युवासेनेच्या वतीने सोमवार, 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांनी केले. आंदोलनास शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेनेचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. आंदोलनादरम्यान पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र टीका करण्यात आली.
आंदोलनस्थळी आमदार संजय देरकर यांनी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी वणीचे ठाणेदार गोपाल उंबरकर उपस्थित होते. परिसरातील गुटखा व अमली पदार्थ विक्रीमुळे तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे सांगत तातडीने कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. आंदोलकांनी इशारा दिला की, 8 दिवसांच्या आत गुटखा व अमली पदार्थ विक्री पूर्णपणे थांबवून दोषींवर ठोस कारवाई न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. लोकशाही मार्गाने आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई केली जाते, मात्र समाज उद्ध्वस्त करणाऱ्या गुटखा तस्करीकडे दुर्लक्ष का, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
या आंदोलनात शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संजय निखाडे, राजू तुराणकर, आयुष ठाकरे, बंडू चांदेकर, दिलीप काकडे, गणपत लेडांगे, सुधीर थेरे, पुरुषोत्तम बुटे, राष्ट्रवादीचे दिलीप भोयर, लढा संघटनेचे प्रविण खानझोडे, अजय धोबे, शत्रुघ्न मालेकर, अनिकेत बदखल, गुलाम रंगरेज, दत्ता बोबडे, अभय चौधरी, मिलिंद बावणे, विनोद दुमणे, सुरेश शेंडे, अजय चन्ने, सचिन पचारे, किशोर ठाकरे, संतोष कुचनकर, संदिप गोहकार, विजय अवताडे, अमृत फुलजले, आशिष रिंगोले, अमोल झोटिंग, मोरेश्वर उज्वलकर, चेतन उलमले, गुड्ड घाटोळे, राजू पाटील, विशाल देवतळे, शंकर देरकर, संस्कार हेपट, रवी कांबळे, अक्षय लाडे, रोशन जाधव, मोहम्मद अन्सार, योगेश उपरे, नारायण गोडे, अभिजीत चालकुळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.





Comments are closed.