बहुगुणी डेस्क, वणी: वणी-घुग्घुस रोडवरील पुनवट-पुरड जवळ काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला. एका भरधाव कारने दोन दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झालेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. बुधवारी दिनांक 11 फेब्रुवारी रोजी रात्री 8.15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. विजय जनार्धन धोबे (48) रा. गुरुनगर वणी व रवि मंगेश पोहरे (48) रा. शात्रीनगर वणी असे अपघातात मृत्य़ू झालेल्यांची नावं आहेत. कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, कारचालक हा वणीतील रहिवासी असून तो टाटा कर्व कारने (MH29CJ0607) चंद्रपूरहून वणीच्या दिशेने येत होता. याच वेळी वणीतील विजय व रवि हे एका दुचाकीने तर पुनवट येथील महेंद्र निब्रड व त्यांचा मुलगा दुस-या दुचाकीने वणीच्या दिशेने येत होते. दरम्यान रात्री 8.15 वाजताच्या सुमारास पुनवट व पुरड दरम्यान या भरधाव कार दोन्ही दुचाकींना मागून जबर धडक दिली.
अपघाताची होताच रस्त्यावरील प्रवाशांनी शिरपूर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मदतकार्यास सुरुवात झाली. या अपघातात दुचाकीवरील विजय जनार्धन धोबे (48) व रवि मंगशे कोहळे (48) यांचा मृत्यू झाला. तर दुस-या दुचाकीवरील महेंद्र तुळशीराम निब्रड (40) व त्यांचा मुलगा गौरव महेंद्र निब्रड हे दोघे जखमी झालेत. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. गंभीर रुग्णाला उपचारासाठी बाहेरगावी रेफर करण्यात आल्याची माहिती आहे.
काळजाचा थरकाप उडवणारे दृष्य
ही धडक इतकी जबर होती की दुचाकीस्वार काही अंतरावर उडाले. कारवरील नियंत्रण सुटले असल्याने कारने काही अंतरावर दोन्ही दुचाकीला फरफटत नेले. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात दोन्ही दुचाकी व कार जाऊन अशा तिन्ही गाड्या थांबल्या. अपघातात एकाचे दोन्ही पाय कटल्याची माहिती आहे. हे दृष्य काळजाचा थरकाप उडवणारे होते, प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.
धडक देणारी कार ही अवघ्या तीन ते चार महिन्यांपूर्वी घेतल्याची माहिती आहे. कार चालक हा वणीहून चंद्रपूर येथे कार सर्विसिंग साठी घेऊन गेला होता. रात्री कार सर्विंसिंग झाल्यावर वणीला परत येताना हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. कारचालक हा नवशिका असल्याने कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याचा अंदाज बांधला जात आहे. तर बापलेक हे चारगाव येथे कामानिमित्त जात असल्याची माहिती आहे. या अपघातामुळे एकच खळबळ उडाली. अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.





Comments are closed.