धक्कादायक – शेजारी तरुणाचे चिमुकल्याशी अश्लिल चाळे

पोलिसांनी आवळल्या विकृत तरुणाच्या मुसक्या, वणीतील घटना

बहुगुणी डेस्क, वणी: एका 5 वर्षाच्या चिमुकल्या सोबत अश्लिल चाळे करणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वणीतील शास्त्री नगर परिसरात शनिवारी दिनांक 7 मार्च रोजी रात्री ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करत त्याच्या मुसक्या आवळल्या. 

Birthday

अशी उघडकीस आली घटना
शनिवारी मुलाचे वडील हे चिमुकल्यासह घरी झोपलेले होते. तेव्हा चिमुकला हा वडीलांना अयोग्य प्रकारे स्पर्श करीत होता. गेल्या काही दिवसांपासून मुलाच्या वागण्यात अचानक बदल झाल्याने त्याच्या आई-वडिलांना हा प्रकार संशयास्पद वाटला. त्यांनी मुलाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने घराशेजारी राहणारा मामा (30) अशाच प्रकारे करीत असल्याचे सांगितले. तसेच अनेकदा शेजा-याने असा प्रकार केल्याचेही माहिती दिली.  

या प्रकारामुळे मुलाच्या पालकांना धक्का बसला. त्यांनी तातडीने याची माहिती पोलीस हेल्पलाईन डायल 112 वर दिली. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठत या प्रकरणी रितसर तक्रार केली. पोलिसांनी आरोपी मामाला (30) विरोधात बीएनएसच्या कलम 65 (2) BNS व पोक्सोच्या कलम 4,5 (L) (M) (N), 6,10 कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पोलिसांनी आज रविवारी पहाटेच्या सुमारास आरोपीला त्याच्या घरातून अटक केली. आज आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक/प्रियंका चौधरी करीत आहे. 

बेपत्ता तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Comments are closed.