श्रीराम मंदिराचे मा. पूजारी विजय औरसकर यांचे दीर्घ आजाराने निधन

मंगळवारी सकाळी लालगुडा येथील राहत्या घरून अंत्ययात्रा

बहुगुणी डेस्क, वणी: श्रीराम मंदिर खाती चौक येथील श्रीराम मंदिराचे माजी पूजारी विजय रावजी औरसकर (60) यांचे आज सोमवारी दिनांक 09 मार्च 2026 सोमवार सकाळी 10 वाजता दु:खद निधन झाले. त्यांनी अविरत 15 वर्षे मंदिरात सेवा बजावली होती. गेल्या दोन वर्षापासून ते आजारी होते. गेल्या दोन महिन्यापासून त्यांच्यावर नागपूर येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होता. मात्र आज सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव आज दुपारी त्यांचे पार्थिव राहते घर लालगुडा येथे आणण्यात आले आहे. अत्यदर्शनानंतर मंगळवारी सकाळी 10 वाजता अंत्ययात्रा राहते घर अहिल्याबाई होळकर सभागृह, लालगुडा येथून निघणार आहे. त्यांच्या निधनाने वणी शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, सुन जावई असा आप्त परिवार आहे.  

Comments are closed.