संत गाडगेबाबांच्या पुतळा विटंबना घटनेचा वणीत निषेध
बंटी तामगाडगे, वणी: मध्यप्रदेशातील ग्यालियर जिल्ह्यातील तिघरा गावात ३ एप्रिलच्या रात्री काही समाज कंठकांनी संत गाडगे बाबाच्या पुतळ्याची विटंबना केली. या घटनेचा गुरुवारी वणीत निषेध करण्यात आला. धोबी समाजाच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देऊन आरोपींना अटक करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
संपूर्ण भारतभर स्वछेतेचा मंत्र देणारे गाडगे बाबाच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने धोबी समाज संतप्त झाला आहे. या प्रकरणाचा तपास ताबोडतोब करून विटंबना करणा-या समाजकंटकांवर लवकरात लवकर अटक करून कठोर शासन करावे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारादेखील निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देते वेळी कैलास बोबडे, मनोज चिंचोलकर, राहुल चौधरी, प्रशांत महाकुलकर, उमाकांत भोजेकर, बाळू तुराणकर, प्रदीप मुक्के, दिलीप चौधरी, दिलीप मस्के, राजेश क्षीरसागर, राजेश महाकुलकर, नरेन्द्र चौधरी, सतीश दोडके, नरेंद्र क्षीरसागर यांच्यासह समाजबांधव उपस्तिथ होते.
लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ….