शनिवारी संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

रक्तदान शिबिर, वृद्धाश्रमात साहित्य वाटप आणि व्यावसायिक कार्यालय उद्घाटनाचे

बहुगुणी डेस्क, वणी: शेतकरी व कामगार नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे. शनिवारी दि. 23 मे 2026 रोजी वणीत या निमित्ताने दिवसभरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Birthday

सकाळी 10.30 वाजता शेतकरी मंदिर, वणी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश देत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अपघात, शस्त्रक्रिया किंवा विविध आजारांमुळे रक्ताची गरज सतत भासत असते. अशावेळी एका व्यक्तीच्या रक्तदानातून अनेकांचे प्राण वाचू शकतात, ही भावना या उपक्रमामागे आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दुपारच्या सत्रात वणी येथील वृद्धाश्रमात साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. समाजातील ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, वृद्धाश्रमातील गरजूंना उपयोगी साहित्य देण्यात येणार आहे. तसेच दुपारच्या सत्रातच ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.

DSK कंस्ट्रक्शनचे उद्घाटन
संध्याकाळी 6 वाजता डीएसके कंस्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स या व्यावसायिक प्रतिष्ठानाच्या कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते शहरातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके राहणार आहे. संजय खाडे यांचे चिरंजीव धनंजय खाडे हे या प्रतिष्ठानाचे संचालक आहेत. सामाजिक कार्यासोबतच विकासाभिमुख उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने हा नवीन उपक्रम सुरू होत आहे.

या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी संजय खाडे फाउंडेशन, जय जगन्नाथ मल्टीस्टेट पतसंस्था, श्री लक्ष्मीनारायण पतसंस्था तसेच संजय खाडे मित्रपरिवाराचे सदस्य परिश्रम घेत आहेत.

Comments are closed.