पेपरला जाताना बाईकला रोहीची धडक, विद्यार्थ्याचा मृत्यू

मृतक विशालचा होता आज शेवटचा पेपर

0

सुशील ओझा, झरी: मुकुटबन जवळ बाईकला रोहीने धडक दिल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून विद्यार्थ्याची बहिण किरकोळ जखमी आहे. गुरूवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.महत्त्वाचं म्हणजे मृतकाचा आज शेवटचा पेपर होता.

झरी तालुक्यातील गणेशपुर येथील विशाल भास्कर पिंपळकर वय १७ वर्ष व त्याची लहान बहिण वैष्णवी हे दोघेही मुकुुटबन येथील आश्रम शाळेत शिकतात. विशाल 11 वीचा विद्यार्थी होता, तर वैष्णवी 9 व्या वर्गात शिकत आहे. विशाल सकाळी ७ वाजता त्याच्या बहिणीला घेऊन शाळेत पेपरसाठी जात होता. मुकुटबन जवळ असणाऱ्या सितारा बार जवळ विशालच्या बाईकला (एम एच् २९ बी जी ३२४८) रोहीने धडक दिली. त्यामुळे दोघेही गाडीवरून पडले. यात विशाल डोक्यावर पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याच्या मागील बाजूला जबर मार लागला. तर लहान बहिणीला कीरकोळ इजा झाली.

बाईकवरुन पड़ताच लहान बहिण भावाला वाचविण्याकरिता आरडा ओरड करू लागली. तितक्यात बाजूने गुरुकुल शाळेची स्कूलबस जात होती. ड्रायवरला अपघात झावाचे दिसताच त्यांनी बस थांबवून विशालला उचलून ऑटोमध्ये टाकून शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी विशालला मृत घोषीत केले.

सदर घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच मुकुटबनसह परिसरातील जनतेची पाहण्यास गर्दी झाली.
मृत्युची माहिती मिलताच आश्रम शाळेचे संचालक गणेश उदकवार, सोनू उदकवार  सह सर्व शालेतिल शिक्षक मुख्याध्यापक रुग्णालयात हजर झाले व पोलिसनी पंचनामा केला व वनविभागाला निवेदन दिले.

पेपर संपण्या आधीच काळाचा घाला
विशाल 11 वी सायंसचा विद्यार्थी होता. सध्या त्याचे पेपर सुरू होते. गुरूवारी त्याचा शेवटचा पेपर होता. त्यानंतर त्याचे कॉलेज संपणार होते. पेपरसाठी तो निघालाही मात्र नियतीला ते मान्य नव्हतं. त्याआधीच त्याच्यावर काळाने घाला घातला. विशाल हा मनमिळावू स्वभावाचा असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.