नगर परिषद शिक्षकांची सहविचार सभा संपन्न

0

देवेंद्र खरवडे (सांस्कृतिक प्रतिनिधी) वणी: स्पर्धात्मक युगात मराठी शाळा टिकवून ठेवणे व विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षकाला नेहमी अपडेट असने आवश्यक आहे. शिक्षकांमध्ये वैचारिक देवाणघेवाण होण्यासाठी दि. 10 एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र 2 येथे नगर परिषद शाळांमधील कार्यरत सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांची सहविचार सभा घेण्यात आली.

या सभेच्या अध्यक्षा म्हणून शिक्षण सभापती आरती वांढरे होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रशासन अधिकारी गिरीधर चवरे साहेब होते. तर प्रमुख अतिथी म्हणून धनराजभाऊ भोंगळे होते, या सहविचार सभेत सर्व नगर परिषद शाळांमध्ये नर्सरी सूरू करणे, शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे, उन्हाळी बालसंस्कार शिबिर आयोजित करणे संदर्भात साधकबाधक चर्चा झाली.

शिक्षण सभापतींनी शाळांना आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा विश्वास व्यक्त केला, कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक वसंत गोरे यांनी केले. सभेला सर्व शिक्षक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.