दिवसाढवळ्या घरफोडी; खिडकीचे ग्रील तोडून रोकड लंपास

शेतीच्या मकत्यातील रोख रक्कमेवर चोरट्यांचा डल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील रामपूरा वॉर्ड परिसरात अज्ञात चोरट्यांनी घराच्या किचनच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून घरात प्रवेश करत कपाटातील ₹15 हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी देवराव नथ्थुजी जांभूळकर (वय 65) हे रामपूरा वॉर्ड, वणी येथील रहिवासी असून गावोगावी आठवडी बाजारात हॉटेलचे साहित्य विक्रीचा व्यवसाय करतात. रविवारी, दि. 5 जुलै रोजी सकाळी 11:00 वाजताच्या सुमारास ते पत्नीसह दीपक चौपाटी येथील आठवडी बाजारात विक्रीसाठी गेले होते. सायंकाळी सुमारे 7:30 वाजता प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने ते घरी परतले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

घराचे गेट आणि मुख्य दरवाजा उघडून आत गेल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. किचनमधील लोखंडी कपाट उघडे असून त्यातील साहित्य खाली फेकलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तपासणी केली असता कपाटात ठेवलेले शेतीच्या मकत्यातून आलेले ₹15,000 रोख गायब असल्याचे आढळले. त्याचवेळी किचनच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचेही स्पष्ट झाले.

या प्रकरणी देवराव जांभूळकर यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 305(a) आणि 331(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Comments are closed.