सेवानिवृत्त शिक्षक मारोती राघोबा आसुटकर यांचे निधन
आज दु. 12 वा. वणी येथील मोक्षधाममध्ये अंत्यसंस्कार
बहुगुणी डेस्क, वणी: अडेगाव (ता. झरी-जामणी, जि. यवतमाळ) येथील सेवानिवृत्त शिक्षक मारोती राघोबा आसुटकर (वय 90) यांचे शनिवार, दि. 4 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता वणी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर रविवार, दि. 5 जुलै 2026 रोजी दुपारी 12 वाजता वणी येथील मोक्षधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगी ललिता चंद्रभान ढवस, जावई डॉ. चंद्रभान उद्धवराव ढवस तसेच नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे अडेगाव, वणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Comments are closed.