डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पोस्टर रंगवाा स्पर्धा

110 चिमुकल्यांनी घेतला सहभाग

0

देवेंद्र खरवडे (सांस्कृतिक प्रतिनिधी) वणी: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र 8 वणी येथे दि. 12 एप्रिल रोजी पोस्टर रंगविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त, महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक समता सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रात राबविला जात आहे, त्या अनुषंगाने ही स्पर्धा घेण्यात आली होती.

या स्पर्धेत शाळेतील 110 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र रंगवले. ही स्पर्धा 1 ते 4 व 6 ते 8 अशा दोन गटात घेण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक बंडूजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षिकांनी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ….

Leave A Reply

Your email address will not be published.