बहुगुणी डेस्क, वणी: प्रेक्षकांचा लाडका सुपरहिरो स्पायडरमॅन पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला असून, बहुप्रतिक्षित ‘Spider-Man: Brand New Day’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. टॉम हॉलंड पुन्हा एकदा पीटर पार्कर अर्थात स्पायडरमॅनच्या भूमिकेत दिसणार असून, डेस्टिन डॅनियल क्रेटन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. झेंडाया, सॅडी सिंक, जेकब बटालॉन, जॉन बर्नथल, मायकेल मँडो आणि मार्क रफालो यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा वणीकरांना सुजाता थिएटरमध्ये पाहता येणार आहे. दु. 12 व रात्री 9 वाजता 3 डी तर दु. 3 व संध्या. 6 वाजताचा शो 2 डीमध्ये पाहता येणार आहे.
अत्याधुनिक साउंड सिस्टिम, मोठा स्क्रीन, आरामदायी आसन व्यवस्था आणि भव्य थिएटर वातावरणामुळे प्रेक्षकांना खराखुरा आनंद घेता येणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून बुक माय शो, पेटीएम मुव्ही व डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटो या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. विशेष म्हणजे डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटोवर तिकीट बुकिंगवर विशेष सुट देण्यात येत आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे.
काय आहे ‘ओडीसी’ची कथा?
‘No Way Home’च्या घटनांनंतर तब्बल चार वर्षांनी या कथेची सुरुवात होते. पीटर पार्करने स्वतःला आपल्या प्रिय व्यक्तींच्या आयुष्यातून आणि त्यांच्या आठवणींतून दूर केले आहे. आता न्यूयॉर्कमध्ये कुणालाही त्याचे पूर्वीचे आयुष्य माहीत नाही. या परिस्थितीत तो पूर्णवेळ स्पायडरमॅन बनून गुन्हेगारीविरोधात लढत असतो. मात्र, सततच्या संघर्षाचा त्याच्या शरीरावर आणि अस्तित्वावर अनपेक्षित परिणाम होऊ लागतो. त्याचवेळी शहरात घडणाऱ्या रहस्यमय घटनांमागे एक मोठा धोका दडलेला असल्याचे समोर येते. त्यामुळे पीटरला स्वतःच्या अस्तित्वासोबतच आपल्या शहरातील आणि जवळच्या व्यक्तींवरील संकटाचा सामना करावा लागणार आहे. अॅक्शन, सुपरहिरो थरार, भावनिक संघर्ष आणि रहस्यमय धोक्याचा रोमांचक मेळ असलेला ‘Spider-Man: Brand New Day’ हा स्पायडरमॅनच्या कथेला एका नव्या दिशेने घेऊन जाणारा चित्रपट ठरणार आहे
सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057 या क्रमांकावर संपर्क साधावा…
पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.
फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
Comments are closed.