वणीतील देवेंद्र उर्फ बंडू अंबुरे यांचे निधन

आज बुधवारी दु. 12 वा. राहत्या घरून अंत्ययात्रा

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील विराणी टॉकीज मागे येथे राहात असलेले देवेंद्र उर्फ बंडू अंबुरे यांचे मंगळवारी रात्री 11-50 वाजता निधन झाले. ते 48 वर्षांचे होते. ते केबल व नेटवर्क टेक्निशिअन म्हणून खासगी काम करीत होते. सहा महिन्यांआधी त्यांना अन्ननलिकेच्या कँसरची लागण झाली. त्यांच्यावर नागपूर येथे उपचारही सुरु होता. दोन दिवसांआधी त्यांची प्रकृती अचानक धासळली. मंगळवारी रात्री 11-50 मिनीटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एक मनमिळावू व्यक्ती म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. त्यांच्या पश्चात आई वडील, भाऊ, बहिण, पुतणी, भाचे असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज बुधवारी दिनांक 5 ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार केले जाणार आहे. अंत्ययात्रा दु 12 वाजता राहते घर विराणी टॉकीज मागे येथून निघेल.

Comments are closed.