शनिवारी वणीत रंगणार ‘आज़ादी की दौड़’ स्पर्धा

पुरुष व महिला गट, 50 हजार रुपयांची बक्षीस रक्कम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शिक्षण प्रसारक मंडळ, वणी आणि सुगंगगा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने “आज़ादी की दौड़ स्पर्धा” या भव्य धावस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा उत्साह आणि शारीरिक तंदुरुस्ती यांचा संगम घडवणारी ही स्पर्धा शनिवारी दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथे पार पडणार आहे.

या स्पर्धेत 5 किमी आणि 3 किमी रोड रेसचे आयोजन करण्यात आले असून, पुरुष व महिला अशा वेगवेगळ्या गटांमध्ये विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. एकूण 50 हजार रुपयांची बक्षीस रक्कम विजेत्यांमध्ये वाटली जाणार असून, पदक व प्रमाणपत्रेही देण्यात येतील. 

पुरुष व महिला गटात 16 वर्षांवरील स्पर्धकांसाठी 5 किमी रेस तर 12 ते 16 वर्षे वयोगटातील स्पर्धकांसाठी 3 किमी रेस आयोजित करण्यात आली आहे. विजेत्यांना अनुक्रमे 5 हजार, 4 हजार, 3 हजार, 2 हजार व 1 हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी 25 ऑगस्टपर्यंत करता येणार असून, 28 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून धावपटू क्रमांक, वैद्यकीय प्रमाणपत्र व पडताळणी केली जाणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

नोंदणीसाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अधिक माहितीसाठी आयोजक प्रा. कमलेश बावणे (93706 16279), प्रा. गौतम जीवने (88569 85434) व प्रा. अजय राजूरकर (86691 30089) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही स्पर्धा वणीतील युवकांमध्ये देशभक्तीचा उत्साह जागवून क्रीडा संस्कृतीला नवे बळ देईल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

Comments are closed.