शेतकरी सुकाणू समितीचे रधुनाथदादा पाटील यांची जाहीर सभा संपन्न

शहीद अभिवादन शेतकरी जागृत यात्रा मारेगावात दाखल

0

मारेगाव: महाराष्ट्र सुकाणू समितीचे रधुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वात दि.२३ मार्चला सांगलीवरुन निघालेली शेतकरी जागृती यात्रा दि.१४ एप्रिलला सकाळी 10 वाजता मारेगाव येथील जिजाऊ चौकात दाखल झाली. प्रथम डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन जिजाऊ चौकात शेतकरी जागृती सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेचे मार्गदर्शक रधुनाथदादा पाटील यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणावर स्पष्टीकरणासह मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंता मांडवकर यांनी केले. तर संचालन संभाजी ब्रिगेडचे प्रमोद लडके यांनी केले.

या शेतकरी जागृती सोबत शेतकरी सुकाणु समितीचे कार्याध्यक्ष कालिदास आपीट,विदर्भ प्रमुख दिनकर दाभाडे,उसतोडणी कामगार अध्यक्ष आनंद भालेकर,बळिराजा संघटनेचे अध्यक्ष गणेश काका जगतात, सत्यसशोधक शेतकरी सभेचे किशोर धमाले इत्यादी राज्य पातळीवरील शेतकरी नेते शेतकरी जागृति यात्रेत सहभागी होते.

या सभेत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, कृषीमालाला हमीभाव, स्वामीनाथन आयोग लागू करुन अंमलबजावणी करा,शेतकर्याना पूर्णवेळ विज उपलब्ध करा अशा अनेक मागन्या केल्या गेल्या शिवाय सुकाणू समिती स्वस्थ बसनार नसल्याचा इशारा शासनाला देण्यात आला.

या शेतकरी जागृती यात्रेचे आगमन होताच मारेगाव येथील संभाजी ब्रिगेड पक्षाचे व भाकपचे कार्यकर्त्यांनी रधुनाथदादा पाटील यांचे स्वागत केले. यावेळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अनामिक बोढे, सचिव ज्योतिबा पोटे, संभाजी ब्रिगेडचे नेते अनंत मांडवकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, रुद्रा कुचनकर, भाकप पक्षाचे अनिल घाटे, बंडु गोलर, पुंडलिक ढुमने, अभय पानघाटे, कुंदन पारखी, राहुल घागी, प्रफुल आदे, बंडु उज्वलकर प्रहारचे मृत्युंजय मोरे, अशोक कोरडे, धनराज अडबाले, प्रकाश कोल्हे, श्रीकांत तांबेकर आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.