राजूर येथे आसिफासाठी कँडल मार्च

0

महेश लिपटे(राजूर): राजूर येथे बहुजन स्टुडंट्स फेडरेशन आणि MIM तर्फे जम्मू येथे आसिफावर झालेल्या बलात्कार आणि खुन याचा निषेध म्हणून कँडल मार्च काढण्यात आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

राजूर येथील महिला मंडळ हॉल इथून कँडल मार्च काढून याचा भगत सिंग चौकात समारोप करण्यात आला. कँडल मार्चमध्ये गावातील नागरीक, विद्यार्थी, महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होऊन त्या घटनेचा निषेध व्यक्त केला. या कँडल मार्च आयोजनासाठी बहुजन स्टुडंट्स फेडरेशन आणि MIM च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.