आदिवासीबहूल झरीतील महिला अधिकाऱ्याच्या ध्यासाची डिजिटल यशोगाथा

सात अंगणवाड्या होतील डिजिटल, बालकांना मिळेल इलेक्ट्रॉनिक ट्रेनिंग

0

सुशील ओझा, झरी: शासनाने जिल्हा परिषद शाळांचे डिजीटलायझेशन करण्याची मोहीम हाती घेतली. यानंतर आता अंगणवाड्याना आदर्श करण्याची योजना सम्बधित विभागाने अमलात आणली. आदिवासीबहुल झरी तालुक्यात साधारणतः सात अंगणवाड्या डिजिटल केल्या आहेत.

अंगणवाडीतील बालकांना देण्यात येणारे शालापूर्व शिक्षण आणखी आनंददायी व्हावे आणि मुलांच्या शैक्षणिक विकासाला प्रोत्साहन मिळावे या हेतूने तालुक्यातील अंगणवाड्या डिजिटल करण्याची योजना आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे झरीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी सुनीता भगत यांनी ही मोहीम हाती घेतली. आतापर्यंत तालुक्यातील सात अंगणवाड्या डिजिटल केल्या आहेत. तालुक्यातील पहिलीच महिला अधिकारी म्हणून त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे. शून्य ते सहा वयोगटातील बालकांचा भौतिक, शारीरिक आणि सर्वांगीण विकासाच्या हेतू साध्य करण्यासाठी पोषणयुक्त आहार, लसिकरण, आरोग्य तपासणी, आरोग्य शिक्षण, औपचारिक शालेय शिक्षण या सेवा अंगणवाडी केंद्रातूनच अंगणवाडी सेविकांमार्फत पुरविण्यात येतात. यातूनच बालकांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत मिळत असते. अंगणवाड्यांमार्फत बालकांना दिले जाणारे शिक्षणाचे धडे आणि आरोग्य यांवर अधिक भर देण्यात येणार आहेत.

झरी तालुक्यात १०६ अंगणवाड्या व ३० मिनी अंगणवाड्या आहेत. या अंगणवड्यांदरम्यान साधारणतः १३६ अंगणवाडी सेविका तालुक्यातील बालकांच्या सर्वांगीण विकासाची धुरा सांभाळत आहेत .या दरम्यान तालुक्यातील सर्व अंगणवाड्या डिजिटल झाल्यास बालकांना दिले जाणारे शिक्षण बालकेंद्रित व आनंददायी होईल. ई- लर्निंग बालकांना बालवयात मिळून बालकाच्या शिक्षणप्रणालीत मोठे बदल होणार आहेत. शिक्षणाची आवड निर्माण होण्याचे ध्येय या डिजिटल अंगणवाड्यांतून साध्य होणार आहेत.

तालुक्यातील सात अंगणवाड्या डिजिटल करण्यात आल्या आहेत. मुकुटबन क्र.१, मुकुटबन क्र. २, मार्की, माथार्जून, येवती, सुसरी आणि कुंडी या अंगणवाड्यांचा समावेश आहे. या डिजिटल अंगणवाद्यांना LED tv, सौरऊर्जा संच, शैक्षणिक साहित्य, ई-लर्निंग सुविधा, खुर्ची, टेबल, वॉटर प्युरीफायर, ईलेक्ट्रॉनिक वजनकाटा, हाईट मेजरमेन्ट टेप आदी साहित्य पुरविण्यात येईल. अंगणवाडीला एकात्मिक बाल विकास व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमांतून तालुक्यातील अंगणवाड्या आदर्श करण्यात येणार आहेत.

आदर्श अंगणवाडी योजनेमुळे अंगणवाडी केंद्रामध्ये दिले जाणारे शिक्षण बाळकेंद्रित व आनंददायी होईल. ई-लर्निंगमुळे बालकांना गुणवत्तापूर्ण अनौपचारिक शिक्षण देता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे मुलांच्याही शैक्षणिक विकासाला प्रोत्साहन मिळण्याचे मार्ग सोयीस्कर होणार आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.