बोअरवेल व पाईपलाईनच्या कामांसाठी खड्डे, अपघातांची शक्यता
अक्षय कवरासे, वणीः सध्या तालुक्यात पाणीटंचाईचे भीषण सावट आहे. सामान्य जनता पाण्यासाठी टाहो फोडत आहे. यावर उपाययोजना म्हणून प्रशासनाने बोअरवेल आणि पाईपलाईनचे काम सुरू केले. या कामाकरिता शहरातील ढुमेनगर, ते गुरुनगर या भागात खड्डे करणे सुरू झाले आहे. खड्ड्यांच्या बाजूला मातीचे ढीग लावले जात आहेत. या ढिगांमुळे आधीच अरुंद असलेला रस्ता अधिक अरुंद होत आहे.
ही माती संपूर्ण रस्त्यावर येते. त्यामुळे धुळीचा त्रास वाढला आहे. सोबतबच यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. या कामाच्या ठिकाणी कोणतेही सावधतेची सूचना करणारे फलक लावले नाहीत. यावर दक्षतेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हावे अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.