सर्व शाखीय कुणबी समाज वधू-वर परिचय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: सर्व शाखीय कुणबी समाज, अ. भा. धनोजे कुणबी समाज, मनोमिलन, माता अनसूया, योगायोग मॅरेज ब्युरोच्या वतीने श्री नंदेश्वर देवस्थान सभागृह येथे सर्व शाखीय कुणबी समाज वधू-वर परिचय मेळावा झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संजय देरकर उपस्थित होते. मेळाव्याचे प्रमुख पाहुणे प्रभाकर सूर, अशोक चौधरी, अर्चना बोदाडकर, ज्योती सूर, डॉ. शांताराम ठाकरे, रमेश गोफणे, शंकर पुनवटकर, अशोक खामनकर, प्रमोद वासेकर व मानयवर होते. मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी दिवंगत रुधाजी पाटील देरकर तथा माजी आमदार बापुरावजी पानघाटे यांना आदरांजली अपर्ण करण्यात आली. विवाहसंबंधांतील उल्लेखनीय कार्याबद्दल संजय पेचे आणि प्रवीण शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या प्रास्ताविकातून मनोमिलन मॅरेज ब्युरोचे संचालक सुधांशू मोहोड यांनी संलग्न संस्थांच्या कार्याचा परिचय करून दिला. पूर्वी वधू-वरांच्या शोधाकरिता प्रवास व अन्य असा प्रचंड खर्च लागायचा. आता ऑनलाईन सुविधेमुळे वधू-वरांचा शोध घेणे सोपे आणि वेळ तथा पैशांची बचत होते असे त्यांनी सांगितले. आधुनिक युगात हजारोंच्या संख्येत आपण आपल्या ऐच्छिक वधू-वरांचा शोध कम्प्युटर किंवा मोबाईलवर फक्त एका क्लिकवर घेउ शकतो, असेही ते म्हणाले.
कार्यकमाचे प्रमुख अतिथी सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर सूर यांनी विवाहातील अनावश्यक खर्चांवर आळा बसावा यावर भर दिला. डॉ. शांताराम ठाकरे यांनी म्हटले की विवाहानंतरदेखील वधू-वरांसाठी नियमित मार्गदर्शनाची व समुपदेशनाची व्यवस्था झाली पाहिजे. आपल्या अध्यक्षीय भाषणात संजय देरकर यांनी अशा मेळाव्यांची उपयुक्तता सांगितली. विविध ठिकाणी किंवा विदेशांत राहणा-या वधू-वरांसाठी ऑनलाईन नोंदणी हेच अत्यंत सोयीचे माध्यम असल्याचे सांगितले.
उपस्थितांपैकी नीलिमा काळे, गुलाबराव खुसपुरे, प्रशांत मोहोड, योगिता मोहोड, अनंत मांडवकर, नागेश्वर गोरे, रामदास पानघाटे, मुकेश वाघाडे यांनी या मेळाव्यास उपस्थित राहून सदिच्छा दिल्यात. दीडशेहून अधिक उपवर व उपवधूंनी या मेळाव्यात नोंदणी केली होती. संचालन प्रदीप बोरकुटे यांनी केले. सुधांशू मोहोड यांनी सर्वांचे आभार मानले. आयोजनासाठी संदीप रिंगोले, संजय पेचे, राहुल पानघाटे, संजय गोडे, अजय धोबे, दत्ताराम खाडे, मंगेश वासेकर व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.