विवेक तोटेवार, वणी: आयपीएलच्या क्रिकेट मॅचमध्ये सट्टा लावणा-या बुकीच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. रविवारी ही कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एका बुकीला अटक केली आहे.
22 एप्रिल रविवारला सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध चैन्नई सुपर किंग्ज यांच्यात क्रिकेटचा सामना होता. उपविभागीय अधिकारी विजय लगारे यांना या सामन्यासाठी वणीतील एकता नगरमधल्या एका घरातून सट्टा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. लोकांकडून फोनद्वारे पैसे घेऊन सट्टा जुगार सुरु असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी इमरान युसुफ खान याच्या घरात धाड टाकली. यात आयपीएल सिजन 11 साठी फोनद्वारा सट्टा लावण्यात येत असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी इमरान यांच्या घरातून क्रिकेट मॅच सुरू असलेला टीव्ही, पाच मोबाईल, हिशेबाचे कागदपत्र, कॅलक्युलेटर व रोख 64 हजार 160 रुपये जप्त केले आहे.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनात पोउनि अनुप वाकडे, उपविभागीय अधिकारी यांच्या पथकातील सफौ स्वाती कुटे, दिलिप आडकीने. आशिष टेकाडे, रवि इसनकर, संतोष कालवेलवार, डीबी पथकातील सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, नितीन सलाम, अजय शेंडे, अमित पोयाम, दिपक वाड्रसवार यांनी केली.