रासा चौफुलीवर अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई

1 लाख 12 हजाराचा मुद्देमाल जप्त

0

विवेक तोटेवार, वणीः तालुक्यातील रासा चौफुलीवर सोमवारी रात्री 1 वाजताच्या सुमारास पोलिसांनी कारवाई करीत दोन दारुतस्करांना अटक केली.
1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त दारू दुकाने बंद असल्याने अवैध दारू विक्रेत्यांनी रासा घोन्सा या गावाला टार्गेट केले. वणीतून दारू खरेदी करून रात्री घोन्सा येथे ते जात होते. याबाबत वणी पोलीसांना खबर मिळताच त्यांनी रासा चौफुलीवर वाहनांची तपासणी सुरू केली. त्यातील एका अल्टो चारचाकी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 180 एम एल क्षमतेच्या 240 बाटल्या आढळून आल्या. ज्यांची किंमत 12 हजार 480 व वाहनाची किंमत 1 लाख रुपये असा 1 लाख 12 हजार 480 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत आकाश अशोक इंगळे (21) रा. रंगनाथ नगर वणी व श्रीकांत बालाजी वल्ललवार (25) रा. रासा या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 65(अ)व (इ) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास धर्मेंद्र आळे करीत आहे.

Podar School 2025
Leave A Reply

Your email address will not be published.