महावितरण अमरावती परिमंडळातील 48 गुणवंत कामगारांचा गौरव
अमरावती – 27 , तर यवतमाळ येथील 21 कर्मचाऱ्यांचा समावेश, · रोहीणी अशोकराव उमप या ‘ वायरवुमनचा ‘ गौरव
सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: .1 मे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापनदिन व कामगार दिन अशा दुहेरी औचित्यात महावितरण अमरावती परिमंडळातील 48 गुणवंत कामगार गौरविण्यात आले. विद्युत भवन , शिवाजी नगर , कँम्प येभे पार पडलेल्या कार्यक्रमात सर्वप्रथम अमरावती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुहास मेत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी कार्यकारी अभियंते . दिलीप मोहोड , हेमराज ढोके , अतीरीक्त कार्यकारी अभियंते सर्वश्री अनिरूध्द आलेगावकर राजेश मळसणे,प्रदिप अंधारे ,हितेश पारेख, व्यवस्थापक श्री. सुहास देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते.
स्मृती चिन्ह ,प्रमाणपत्र आणि पुष्प अशा स्वरूपाचा असलेला हा गौरव ग्राहकाभिमूखता , अखंडित , सुरक्षीत सेवा इत्यादी अशा विविध पैलूवर आधारीत महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना संपूर्ण नोकरीच्या कार्याकाळात फक्त एकदाच देण्यात येतो. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे महावितरणसारख्या तांत्रिक क्षेत्रात काम करतांना रोहीनी अशोकराव उमप (तंत्रज्ञ ,अमरावती ग्रामीण ) ही पुरूषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करत या गौरवाची मानकरी ठरली.
या प्रसंगी गुणवंत कामगारांचे अभिनंदन करतांना मुख्य अभियंता मेत्रे म्हणाले की, महावितरणमध्ये ग्राहकाभिमूख अनेक बदल होत आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नविन बदल आत्मसात करून पारदर्शक आणि ग्राहकाभिमूक महावितरण अशी ओळख करण्यासाठी स्वत:मध्ये असे सकारात्मक बदल करावेत की, गुणंवत कामगारांची निवड करतांना प्रशासनांसमोर प्रश्न निर्माण होईल. तसेच वीज अपघातांमुळे दोन पिढयांचे नुकसान होत असल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी स्वत: बरोबर आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेची जाणीवपूर्वक काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले .
तसेच अधीक्षक अभियंता (यवतमाळ ) रामेश्वर माहुरे म्हणाले की ,ग्राहकसेवा , बिलींग आणि वसूली या आधारस्तंभावर महावितरणची भिस्त आहे , त्यामुळे आपल्या ग्राहकाभिमूख कामात सातत्य ठेवत असतांना ग्राहकांना वेळेत वीजबिल भरण्यासारख्या चांगल्या सवयी लावण्याचे आवाहन त्यांनी केले. गुणंवत कामगारांचा गौरव ही त्यांच्या कामाची पावती आहे आणि इतरांसांठी प्रेरणादायी पण आहे. त्यामुळे गुणवंत कामगारांनी आपल्या सातत्यपुर्ण सकारात्मक व ग्राहकाभिमूक कामामुळे कायम इतरांसाठी प्रेरणादायी राहण्याचे अधीक्षक अभियंता पायाभूत आराखडा अनिल वाकोडे बोलले . यावेळी गुणवंत कामगारापैकी अमरावती परिमंडळातील विनोद भिमराव गोरले (वरीष्ठ यंत्रचालक, अचलपुर कॅम्प ) यांनी तर यवतमाळ मंडळ कार्यालयातील श प्रभाकर शंकर दिघेवार (वरीष्ठ यंत्रचालक , तिवडी , उमरखेड ) यांनी गुणवंत कामगारांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहाय्यक महाव्यवस्थापक (मास ) रूपेश देशमुख यांनी गुणवंत कामगाराची निवड प्रक्रिया आणि त्यांच्यावर वाढलेली जबाबदारी याविषयी सविस्तर सांगीतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी फुलसिंग राठोड यांनी केले , तर आभार उपमुख्य औद्योगीक संबंध अधिकारी अनंत चवरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी परिमंडळातील अंधिकारी , अभियंते व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.