आदिवासी समुदायाला मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे – डॉ. महेंद्र लोढा
अर्जुनी गावाला स्वखर्चाने खोदून दिली बोअरवेल व सोडविली पाण्याची समस्या
ब्युरो, मारेगावः स्वतंत्र भारतात अजूनही विकासाची गंगा सर्वत्र पोहचली नाही. देशाला वायफाय, डिजिटल टेक्नॉलॉजीने समृद्ध करण्याची खटाटोप सुरू आहे. अनेक मोठमोठाले दावे विकासाचे होत आहेत. मात्र अजूनही दुर्गम अशा ग्रामीण भागात, आदिवासी पोडात ही सुविधा अद्यापही पोहचली नाही. रस्ते, वीज, स्वच्छ पाणी या मूलभूत सुविधादेखील त्यांना मिळत नाही. जर देशाचा संपूर्ण विकास करायचा असेल तर आदिवासी समुदायाला मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. बोअरवेलच्या लोकार्पण सोहळ्यात राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा आदिवासीमित्र डॉ. महेंद्र लोढा बोलत होते. आदिवासीबहुल मारेगाव तालुक्यातील दुर्गम तेेलाई पोड येथे त्यांनी स्वखर्चाने सौरऊर्जेवर चालणाऱ्या दिव्यांची घरोघरी व्यवस्था करून दिली. सोबतच अर्जुनी येथे त्यांनी स्वखर्चाने बोअरवेल खोदून दिली. या सोहळ्याला राष्ट्रवादी पक्षाचे जयसिंह गोहोकर, स्वप्निल धुर्वे, डॉ.प्रीती लोढा, सूर्यकांत खाडे, भारत मत्ते, राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.डॉ. लोढा यांनी केलेल्या या कार्यांसाठी गावकऱ्यांनी त्यांची मिरवणूक काढली. विविध माध्यमांतून आदिवासी बांधवांनी आणि गावऱ्यांनी डॉ. लोढांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
तालुक्यातील रामपुर,पहापळ ते देवाला या गावाला नीट रस्ता नव्हता. पावसाळ्यात तर ही समस्या अधिकच गंभीर होत होती. डॉ. लोढा यांना काही गावकरी भेटले. त्यांची समस्या डॉ. लोढांनी समजून घेतली. या रस्त्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. हा रस्ता आता गावकऱ्यांना अधिक सोयीचा झाला आहे. डॉ. लोढा यांचे कार्य चौफेर सुरू आहे. मारेगाव तालुक्यात ठिकठिकाणी त्यांनी पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था केली आहे. अर्जुनी येथील त्यांनी स्वखर्चाने दिलेली बोअरवेल, आदिवासी पोडांवरील लाईट व इतर सुविधा यामुळे त्यांची जनमानसातील लोकप्रियता अधिकाधिक वाढत आहेे.
वणी, मारेगाव, झरी, पांढरकवडा तालुक्यात त्यांनी विकासकामांचा सपाटा लावला आहे. कोणतीही राजकीय सत्ता हातात नसताना त्यांनी केलेली विकासकामे ही थक्क करणारीच आहेत. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे ठिकठिकाणी सत्कार झाले. त्यांची मिरवणूकदेखील काढण्यात आली. अर्जुनीतील भव्य मिरवणुकीच्या समारोपाचे संचालन राहुल झट्टे यांनी केले तर आभार नितिन गोडे यांनी केले.