गोंडी ढेमसा आणि पारंपरिक लोकनृत्याने घडविले आदिवासी संस्कृतीचे दर्शन

मोहोर्ली येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा पुतळा अनावरण प्रसंगी लोकनृत्य स्पर्धा

0

सुनील इंदुवामन ठाकरे, मोहोर्लीः नवयुवक बिरसा मुंडा समिती मोहोर्लीद्वारा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी भिमालपेन शोभायात्रा, गोंडी ढेमसा, नृत्यस्पर्धा असे अनेक कार्यक्रम झालेत. क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते झाले. याच निमित्ताने रात्री गोंडी ढेमसा या आदिवासींच्या पारंपरिक लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विजेत्यांना विविध पारितोषिकांनी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या नृत्यस्पर्धेचे 5000रू.चे प्रथम बक्षिस डॉ. महेंद्र लोढा यांच्या वतीने लोहारा येथील राणी दुर्गावती गृपला देण्यात आले. येकोडी येथील जय सेवा गृपला पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या वतीने 3000रू.चे द्वितीय बक्षिस देण्यात आले. चंद्रकांत टेकाम यांच्या वतीने 2001रू.चे तृतीय बक्षिस वागधरा गृपला देण्यात आले.

पारितोषिक वितरण सोहळ्यात डॉ. लोढा व मान्यवर

सामाजिक कार्यकर्ते आदिवासीमित्र तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला. यावेळी सरपंच अरविंद डाहुले, उपसरपंच विठ्ठल कोडापे, कवडू वडसकर, रमेश मोहिते, रत्नाकर वैद्य, अरविंद राजूरकर, तंटामुक्ती समिती मोहोर्लीचे अध्यक्ष राजू पावडे, पारखी, मोरे व मान्यवर उपस्थित होते.

या लोकनृत्य स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभात आदिवासी मित्र तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांनी आपले विचार व्यक्त केलेत. डॉ. लोढा म्हणाले की, या देशाची अस्सल संस्कृती जोपासणारा आदिवासी समाज आहे. या समाजाने आपली लोककला, लोकसंस्कृती प्रत्येक नव्या पिढीला हस्तांतरित केली आहे. संस्कृती हा देशाचा प्राण असतो. ही संस्कृती लोककलांमधून जिवंत ठेवण्याचे कार्य आजही आदिवासी बांधव करीत आहेत. या लोककलांमधून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते. ही संस्कृती, या लोककला जपण्याचा प्रयत्न नव्या पिढीतदेखील होत आहे. अशा स्पर्धांमधून या कला व संस्कृतीचे दर्शन सर्वांना घडते ही अत्यंच आनंदाची बाब असल्याचे लोढा म्हणाले. यावेळी अन्य मान्यवरांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले.

बालस्पर्धकांमध्ये प्रचंड उत्साह

आयोजन समितीचे अध्यक्ष भिवाजी मडावी, उपाध्यक्ष किसन टेकाम, सचिव विनोद मडावी, सहसचिव लटारी मेश्राम, कोषाध्यक्ष रमेश कोडापे, नवयुवक कमेटीचे अध्यक्ष चरणदास कोडापे, उपाध्यक्ष सतीश टेकाम, सचिव गौतम मेश्राम, सहसचिव अरुण टेकाम, कोषाध्यक्ष अंकुश गेडाम, उपकोषाध्यक्ष आकाश टेकाम, सदस्य राहुल उइके, आकाश टेकाम, गणेश टेकाम, शुभम आत्राम, चंद्रकांत टेकाम, विलास टेकाम, सतीश पुसाम, संतोष टेकाम, छाया मडावी, गुंपा कोडापे, मनीषा कुमरे, सीमा टेकाम, निशा टेकाम, मंदा टेकाम, तानीबाई आत्राम, पूजा उइके, रंजना कनाके, स्वाती टेकाम, बेबी कोडापे, सदस्य व ग्रामवासियांनी हा कार्यक्रम यशस्वी केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.