सुशील ओझा, झरी:-तालुक्यातील मुकुटबन येथील मुख्य मार्गावरील कापड दुकानाला आग लागल्याने लाखो रुपयांचे कापड जळून खाक झाल्याची घटना २३ मे च्या रात्री ८ वाजता दरम्यान झाली. पांढरकवडा (लहान) येथील रहिवासी अनिल कोठारी याचे कापड दुकान मुकुटबन येथे असून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा व्यवसाय सुरू आहे. काल नेहमी प्रमाणे सायंकाळी ७ वाजता दरम्यान दुकान बंद करून गेले असता रात्री ८ वाजता दरम्यान दुकानातून धूर निघणे सुरू झाले व एकाएकी दुकानातून आगीची लाट निघणे सुरू झाले.
हे दृश्य गावातील जवळ उभे असलेल्या तरुणांना दिसताच आग विजविण्याकरिता धावपळ सुरू केली. वाटेल तिथून पाणी आणून टाकणे सामान दुकानाबाहेर काढण्याचा प्रयत्न केले. परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने काही मिनिटातच दुकानातील सर्व सामान(कपडे)जळून खाक झाले.
दुकानाला लागलेली आग विजेच्या शॉटसर्किट मुळे झाल्याचे जनतेतून बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार यांच्यासह संदीप सोयाम, मारोती टोंगे, उमेश कुमरे सह पोलीस कर्मचारी दाखल झाले .दुकानातील लाखो रुपयांचे कापड जळून खाक झाल्याने १० लाखाचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. दुकान जळून खाक झाल्याने अनिल कोठारी यांच्यावर मोठे संकट येऊन ठेपले आहे तरी त्यांना नुकसान भरपाई मिळावे अशी अपेक्षा मुकुटबन वासीयकडून होत आहे.