स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल वणीचा निकाल 100 टक्के

0

जितेंद्र कोठारी, वणी – नुकताच जाहीर झालेल्या सी. बी. एस. सी. १० वी च्या परिक्षेत वणी येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल मध्ये १००% निकाल लागला . परिक्षेत एकूण ९६ विद्यार्थी बसले होते. चेतन चिंचोलकर, आशिष झाडे, सारा छाजेड ९६.४% गुण प्राप्त करून संयुक्तरित्या प्रथम आले तर शिवदर्शन मदान ९६.२% गुण व ऋत्विक निकुंबे , सुनैना मदान ९५.६% गुण मिळवित अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला .

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

याचसोबत  स्नेहा जितेंद्र कोठारी, निशु अग्रवाल, निकी कुमार,  प्रेरणा चोरडिया, सहानी भंडारी, विश्रृत लोढा, सर्वेश गोहोकर, अंशुल अग्रवाल, यश साखरकर, मिताली कोचेटा व हर्ष वरपटकर ह्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण  मिळवून संस्थेचे गौरव वाढविले आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री क्रिशन जैन, सचिव श्री नरेश जैन यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे  अभिनंदन केले आहे. प्राचार्य सि. सीवारामाकृष्णा ह्यांनी विद्यार्थी, शिक्षकांनी घेतलेल्या अथक परिश्रमाचे हे फळ आहे असे म्हणत आनंद व्यक्त केला

Leave A Reply

Your email address will not be published.