वेकोली कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

0

वणी, विवेक तोटेवार; झटपट येथील वेकोली कर्मचारी व शेतकरी असलेले जनार्दन गोविंदा साळवे यांनी आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे.

Podar School 2025

दिनांक 1 जून रोजी सकाळीच्या सुमारास जनार्दन हे वेकोलीत कर्मचारी असून ते शेती देखील करतात. जनार्दन नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करण्याकरिता गेले. त्यांच्या बहिणीने व शेतात काम करणाऱ्या महिलांनी त्याला बघितले होते. परंतु काही वेळातच जवळपास 11 वाजताच्या सुमारास गावातील लोकांनी आरडाओरडा सुरू केला. बहिणीने जाऊन बघितले असता जनार्दनने आपल्या शेतातील निंबाच्या झाडाला टॉवेलने गळफास घेतला होता. आत्महत्येचे करण अजूनही समजू शकले नाही. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.