ढाणकी ते कृष्णानपूर रस्त्याचे भूमिपूजन
विवेक तोटेवार, वणीः सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या सहकार्याने व लोकसहभागातून ढाणकी ते कृष्णानपूर रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. सदर रस्त्याचे भूमिपूजन डॉ. लोढा यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी गावातील सरपंच, पदाधिकारी, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व मोठया संख्येने गावकरी,महिला, शाळकरी मुले व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. येत्या 36 तासांत हा रस्ता पूर्ण केला जाणार आहे.
काही दिवसांअगोदार म्हणजे येथील काही युवक डॉ. लोढा भेटले. त्यांनी गावातील समस्या डॉ. लोढांपुढे मांडल्या. ज्यामध्ये या रस्त्याचे काम करून द्यावे ही मागणी घातली. डॉ. लोढा यांनी गावकऱ्यांची मागणी त्वरीत मान्य केली व दुसऱ्याच दिवशी कामास सुरवात केली. या रस्त्याने गावकरी व विद्यार्थ्यांची होणारी परवड थांबली
यावेळी बोलताना डॉ. लोढा म्हणाले की, गावागावांना जोडणारे रस्ते अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. शिक्षण, आरोग्य, व्यवसाय अशा अनेक बाबींसाठी आजही शहरांवरती अवलंबून राहावे लागते. त्यामुळे रस्ते असणं आवश्यक आहे. रस्ते म्हणजे देशाच्या रक्तवाहिन्या असतात, कोणतीही राजकीय सत्ता नसताना लोकांच्या सहभागातून हे कार्य घडलं आहे. समाजकारणाला राजकारणाची जोड मिळाली की सर्वांगिण विकास होतो. डॉ. लोढा यांच्या आगमनाने गावात जल्लोष करण्यात आला.डॉ. लोढा यांच्या स्वागत व सत्कार कार्यक्रम घेण्यात आले. गावकऱ्यांनी यावेळी डॉ. लोढा यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.