धनंजय आसुटकर, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील बामर्डा या गावाला जोडणारा पूल कोसळल्याने या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. तसेच पुराचे पाणी बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गेल्या दोन दिवसांमध्ये परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्याचा फटका मारेगाव तालुक्याला मोठ्या प्रमाणात बसला. बामर्डा येथील पुलाचा काही भाग कोसळल्याने इथले जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे पुराची माती रस्त्यावर आली. या गावाला रहदारीचा एकच मार्ग असल्यामुळे दळणवळण करणं अशक्य झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना ये-जा करणे अशक्य झालं आहे.
सध्या शाळा कॉलेजचे दिवस आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी बाहेर गावी जायचे असलेले अनेक मुले पूर आल्यामुळे जाऊ शकले नाही. पूल कोसळल्याने अनेक शेतात पाणी शिरले. दिनेश सोनूले व गजू पिदूरकर यांच्या शेतात पाणी शिरल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
पुलासंबंधी गावकर्ऱ्यांनी वारंवार प्रशासनाला वारंवार विनंत्या अर्ज केले होते. मात्र त्यांनी गावाच्या परिस्तिथीकडे दुर्लक्ष केले. या गावी जाण्यासाठी एकमेव रस्ता आहे व गावामध्ये ये-जा करायचे म्हटल्यास तो रस्ता पार करून ये-जा करावे लागते. पण आता पूल कोसळल्यामुळे रस्ता पार करुन जाणं अशक्य झालं आहे. तरी या कडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी गावक-यांनी केली आहे.
बामर्डा गावातील परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी धनंजय आसुटकर यांनी…
लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ….