दत्त मंदिर झिरी येथे सामूहिक सतारवादन शुक्रवारी

0

सुरेंद्र इखारे, बडनेराः ब्रह्मचारी योगी श्री सीताराम महाराज टेंबे संस्थान येथे समाधी शताब्दी वर्षात पुण्यतिथी सोहळा होत आहे. यानिमित्त संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळ मार्गावरील झिरी येथील दत्तमंदिरात नियमित धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम घेतले जात आहेत. याचाच भाग म्हणून शुक्रवारी रात्री 7.30 वाजता सामूहिक सतार वादनाचा कार्यक्रम होईल. प्रा. योगेश बोडे आणि त्यांचा संच हे सतारवादन करतील. या मैफलीचे निवेदन कवी, लेखक व निवेदक सुनील इंदुवामन ठाकरे करतील.

Podar School 2025

संगीतगुरू प्रा. योगेश बोडे यांच्यासह पूर्वी योगेश बोडे, आसावरी नांदे, सुचिता चौधरी, स्मिता जोशी सतारवादन करतील. त्यांना पखवाजाची साथ प्रा. महेंद्र बोडे तर तबल्याची साथ संकेत जोशी करतील. या मैफलीत मिया मल्हार, मालकंस, किरवाणी, पटदीप, खमाज आदी रागांचे सादरीकरण होईल. दत्तभजनाने मैफलीची सांगता होईल. या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.