विठ्ठलराव रामाजी आंबटकर यांचे निधन

संताजी ज्ञान प्रसारक मंडळाचे होते संस्थापक अध्यक्ष

0

वणी: मांगरुड येथील प्रतिष्ठित व्यक्ती आणि संताजी ज्ञान प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव रामाजी आंबटकर यांचे दीर्घ आजाराने वणीत निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. आज शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता डॉ. कुमार आंबटकर सर्वोदय चौक वणी यांच्या निवासस्थानावरून त्यांची अंत्ययात्रा निघेल.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मांगरुड येथील रहिवाशी असलेले विठ्ठलराव आंबटकर यांचा सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठा सहभाग होता. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यामुळे ते काही दिवस त्यांचा मुलगा डॉ. कुमार आंबटकर यांच्याकडेच राहत होते. त्यांच्या मृत्यूने एक सामाजिक क्षेत्रातील कर्ता व्यक्ती गेल्याची भावना व्यक्त होतेय. त्यांच्यामागे मुले आणि नातवंड असा मोठा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.