ताणून धरलेली उत्सुकता, कुतुहल शिगेला “संघाचं हिंदू राष्ट्राचं स्वप्न” पुस्तकाचा शनिवारी प्रकाशन

एकाच मंचावर मा. गो.  वैद्य ,  पुरुषोत्तम खेडेकर प्रथमच बोलतील

0

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूर: आर एस एसचे मा. गो. वैद्य आणि मराठा सेवा संघाचे संस्थापक सदस्य अॅड.  पुरुषोत्तम खेडेकर पहिल्यांदाच एका मंचावर बोलणार आहे. मीडिया वॉच पब्लिकेशनचे संचालक तथा प्रकाशक अविनाश दुधे यांनी संपादित केलेल्या “संघाचं हिंदू राष्ट्राचं स्वप्न” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी नागपूर येथे होत आहे. दोन टोकांच्या भिन्न मतप्रवाहाचे हे प्रतिनिधी काय भूमिका मांडतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत. या सोहळ्यात होणाऱ्या चर्चासत्राला ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील कानाकोपऱ्यातून श्रोते येणार आहेत. 

 

मीडिया वॉच पब्लिकेशनतर्फे प्रकाशित ‘संघाचं हिंदू राष्ट्राचं स्वप्न साकार होईल का?’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ व याच विषयावरील चर्चासत्राचे आयोजन शनिवार दिनांक व१४ जुलै रोजी नागपूर येथील शंकरनगर चौकातील बाबुराव धनवटे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक सुरेश द्वादशीवार असणार आहेत.

सुरेश द्वादशीवार

सायंकाळी ५ ते ७ या वेळात आयोजित या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. उर्फ बाबुराव वैद्य, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर व सामाजिक कार्यकर्ते लेखक रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ प्रामुख्याने उपस्थित असणार आहेत.

मा. गो. वैद्य

या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन परस्परविरोधी संघटनांचे नेते मा. गो. वैद्य व पुरुषोत्तम खेडेकर प्रथमच एका व्यासपीठावर येणार आहेत . ‘हिंदू राष्ट्’ या सारख्या वादग्रस्त विषयावर हे नेते काय बोलतात हा सर्वांच्या औत्सुक्याचा विषय असणार आहे .

रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ
अॅड. पुरुषोत्तम खेडेकर
संपादक अविनाश दुधे

 

या कार्यक्रमाला नागपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आशुतोष शेवाळकर, अरुणा सबाने, अतुल लोंढे, रमेश बोरकुटे व मीडिया वॉच पब्लिकेशनचे संपादक अविनाश दुधे यांनी केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.