चना चोरी प्रकरण: तक्रारदाराची फेरचौकशीची मागणी
मापारीला खरेदी विक्री संघ वाचवत असल्याचा आरोप
सुशील ओझा, झरी: हरबरा चोरी प्रकरणी सभापतीद्वारे चौकशी बसवण्यात आली. या चौकशीचा अहवाल शनिवारी सादर कऱण्यात आला. मात्र या चौकशीने तक्रादाराचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा चौकशी करून त्याचा अहवाल मागवावा अशी मागणी केली आहे. तसेच तक्रारदारांनी विविध प्रश्न उपस्थित करत मापारीला खरेदी विक्री संघ वाचवत असल्याचा आरोप केला आहे.
काय आहे हे चना चोरी प्रकरण ?
मुकुटबन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये शेतक-यांचे चना आणि तुरी ठेवल्या आहेत. 19 जूनला बाजार समितीचे संचालय मोटार सायकलने बाजार समितीसमोरून जात होते. दरम्यान मापारी हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिंतीवरून उडी मारून जाताना त्यांच्या निदर्शनास आले. या दोघांना विचारपूस केली असता, त्यांनी सॅम्पलसाठी 10 किलो चना काढला असल्याचे सांगितले. मात्र त्या दिवशी कोणतीही खरेदी किंवा ट्रक भरणे सुरू नव्हते. हे प्रकरण समोर येताच एकच खळबळ उडाली. चोरासारखे सॅम्पल कशासाठी नेले जात होते असा प्रश्न उपस्थित करीत सुनील ढाले यांनी याची बाजार समितीमध्ये रितसर तक्रार केली होती.
यावर सभापती संदीप बुरेवार यांनी तक्रारीवर चौकशी बसवली. सर्व संचालक मंडळाची बैठक १४ जुलैला आयोजित करण्यात आली. यात संचालक सुनील ढाले यांनी मापारी विरुद्ध केलेल्या तक्रारी बाबत अहवाल मागविला. त्या अहवालात पहाटे ६ वाजताच्या बसने यवतमाळला हरभऱ्याचे सॅम्पल घेऊन यावे. असे पत्र खरेदी विक्रीच्या सचिवांकडून प्राप्त झाले. त्यामुळे सायंकाळी बाजार समिती बंद झाल्यावरही सॅम्पल नेले. असा खुलासा केल्याचे अहवालात नमुद होते. यावर संचालक सुनील ढाले यांचे समाधान झाले नाही. त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहे की…
- बाजार समिती बंद झाल्यावर समितीच्या कर्मचारी किंवा संचालकांची परवानगी न घेता चना का नेला नाही?
- भिंती वरून उडी मारून सॅम्पल का नेण्यात आले.
- सचिवाचे पत्र होते तर चोरासारखे उडी मारून नेण्याचे प्रयोजन का
- चालकाने तक्रार केल्यावरच मापारीला चना आणण्याचे पत्र कसे मिळाले. संचालकाने पकडल्यावर सचिवाच्या पत्राबाबत खुलासा का केला नाही
- यवतमाळला सॅम्पल घेऊन जायचे होते तर ते दिवसा का नेण्यात आले नाही.
असे अनेक प्रश्न उपस्थित करून सदर मापरीला खरेदी विक्री संघ वाचवत असल्याचा आरोप ढाले यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.