नराधमाचा 4 वर्षीय चिमुरडीवर अनैसर्गिक अत्याचार

मारेगाव तालुक्यातील बोटोणी गोदामपोड इथली घटना

0

मारेगाव: मारेगाव तालुक्यातील बोटोणी गोदामपोड इथं एका चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. अद्याप आरोपीला अटक व्हायची असून माणूसकीला काळीमा फासणा-या या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जातोय.

आरोपी अनुराव वसंता आत्राम (26) हा बोटोणी गोदामपोड इथे राहतो. त्याच्या घराशेजारी पीडित मुलगी राहते. तिचे आईवडील मजुरीचे काम करतात. रविवारी तिचे आईबाबा मजुरीसाठी गेले होते.  दुपारी पीडिता घरी एकटीच होती. याचा फायदा घेऊन अनुराव याने चिमुरडीला घरी बोलावले. तिला खर्रा आणण्यासाठी पैसे दिले. चिमुरडी खर्रा घेऊन घरी परतली असता आरोपीने तिच्यावर बळजबळी अत्याचार केला. झालेल्या प्रकारानंतर पीडिता रडू लागली. त्यामुळे आरोपीने तिला सोडून दिले.

रात्री पीडितेचे आईवडील घरी परतले. त्यांना चिमुरडीला बसण्यास त्रास होत असल्याचे दिसून आले. त्यांनी तिला विचारणा केली असता तिने रडत रडत घडलेला सर्व प्रकार तिच्या आईवडीलांना सांगितला. तिच्या आईने तिची तपासणी केली असता तिच्यावर पाषवी अत्याचार झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच मारेगाव पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दाखल केली.

सध्या मुलीवर वैद्यकीय उपचार सुरू आहे. तर आरोपीला अटक व्हायची आहे. आरोपीवर भादंवि कलम 376 (2) (I) , 377 सह बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कलम 4 व 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.