किशोर तिवारी यांची ग्रामीण रुग्णालयाला भेट, अधिका-यांना धरले धारेवर
रुग्णालयातील गैरसोयीबाबत मनसे आक्रमक
विवेक तोटेवार, वणी: ग्रामीण रुग्णालय सध्या समस्येचे आगार बनले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. मात्र इथे विविध सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे रुग्णांची प्रचंड हेळसांड होतेय. मीडियाने वेळोवेळी याचा पाठपुरावा केला होता. मात्र परिस्थिती जैसे थे होती. अखेर या भोंगळ कारभाराची दखल घेऊन स्वावलंबी शेतकरी मिशनचे किशोर तिवारी यांनी गुरुवारी वणी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली.
दुपारी अडीचच्या सुमारास किशोर तिवारी ग्रामीण रुग्णालयात आले. त्यांनी रुग्णालयाची पाहणी केली. ग्रामीण रुग्णालयाततील परिस्थितीबाबत त्यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी रुग्णालयाच्या परिस्थितीवर त्यांनी संताप व्यक्त करत अधिका-यांना चांगेलच धारेवर धरले. रुग्णालय परिसरातील घाणीचे आहे. इथल्या स्वच्छतेची जबाबदारी त्यांनी नगरपालिकेकडे सोपवली. रुग्णालयात सिजरची व्यवस्था नाही. ही व्यवस्था तात्काळ करावी असा आदेशही त्यांनी दिला. तसेच बंद अवस्थेत असलेल्या ट्रामा केअर बिल्डिंगचीही त्यांनी पाहणी केली. दै-यानंतर त्यांनी मनसे कार्यालयाला भेट दिली.
रुग्णालयातील गैरसोयीबाबत मनसे आक्रमक
ग्रामीण रुग्णालयातील गैरसोयीबाबत मनसे आक्रमक झाली असून मनसेने ग्रामीण रुग्णालयातील विविध समस्येवर किशोर तिवारी यांच्याशी चर्चा केली. ग्रामीण रुग्णालयातील ट्रामाकेअर सेंटर अद्याप सुरू झालेेेले नाही. मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजूभाऊ उंबरकर यांच्या नेतृत्वात ट्रामा केअर सेंटर त्वरित सुरू करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी रुग्ण सेवा केंद्राचे धनंजय त्र्यंबके, अजीज शेख, लक्की सोनकुवर, रमेश सोनुले, निखिल जोगी, इरफान सिद्धीकी, हरीश कामारकर, सूरज बूट, चांद बहादे, धम्मदीप शंभरकर, आकाश खामनकर, निखिल मेहता, शुभम पिंपळकर आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
लवकरात लवकर ट्रामा केअर सेंटर सुरू करू असे तोंडी आश्वासन यावेळी किशोर तिवारी यांनी दिले. जर मनसेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले तर मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला.