विवेक तोटेवार, वणी: भाजपच्या नगरसेवकावर एका विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलग तीन वर्ष प्रेमसंबंधातून लैंगिक शोषण केल्याचा आरोप या नगरसेवकावर लावण्यात आला आहे. सध्या ही तरुणी सज्ञान असून हे शोषण ती अल्पवयीन असताना करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हाच नगरसेवक काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या महिलेचा अश्लिल एमएमएस काढण्याच्या प्रकरणातही आरोपी आहे.
10 व्या वर्गात शिक्षण घेत होती. ती वणीतील रंगारीपुरा येथे शिकवणी वर्गासाठी यायची. त्यावेळी धीरज पाते (29) राहणार वासेकर ले आउट वणी हा तिचा पाठलाग करायचा. एके दिवशी त्याने चिठ्ठी देऊन त्यावर त्याचा मोबाईल क्रमांक लिहिला. तसेच या नंबरवर संपर्क करण्याचे सांगण्यात आले. मात्र पीडितेने त्याला उत्तर दिले नाही. पुढे धीरजने पुन्हा चिठ्ठी दिली. यावेळी पीडितेने जवळपास 15 दिवसांनी त्याला फोन केला. फोनवर बोलता बोलता त्यांच्यात मैत्री झाली.
पीडितेने 11 वीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर धीरज पाते हा तिला कॉलेजमध्ये सोडण्यासाठी व घेण्यासाठी यायचा. परंतु वारंवार भेटणे तिला पसंद नव्हते. पुढे 12 वी साठी पीडितेने नांदा, चंद्रपूर येथे ऍडमिशन केली. परंतु शिकवणी वर्गासाठी तिला वणीतच राहावे लागायचे. एकदा धीरजे पीडितेला भेटण्यासाठी त्याच्या मित्राच्या घरी बोलवले. मित्राच्या घरी कुणीच नसताना धीरज पाते याने तिला घरी बोलवले व तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.
दरम्यान गोड बोलून आरोपी धीरज पाते याने पीडितेचे कागदपत्रे मागून घेतले. ते कागदपत्र घेण्यासाठी त्याने तिला स्वतःच्या घरी बोलावले. तिथे त्याने जर कागदपत्रे हवे असतील तर जे बोलेल ते करावे लागतील असे बोलला. अन्यथा बदनामी करेल अशी धमकी देत त्याने पीडितेचे पुन्हा लैंगिक शोषण केले. पुढे पीडितेने चंद्रपूरला डीएमएलटीला ऍडमिशन घेतली. मात्र तिथेही पाते याचा तिला त्रास होता.
तयार केली फेक फेसबुक आयडी
पुढे धीरज पातेचा फोनवर अधिक त्रास वाढल्याने पीडितेने सिमकार्ड नष्ट केले. परंतु धीरजने तिच्या कागदपत्राचा उपयोग करून तिच्या नावे नवीन सिमकार्ड घेतले. व फेसबुकची आयडी तयार केली. धीरज पाते याने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आपले दोन फोटो अपलोड केले व पीडितेच्या नावाने शुभेच्छा दिल्या. या प्रकाराने पीडिता हादरून गेली. पुढे 22 मार्च 2018 ला या त्रासाला कंटाळून तिने ही सर्व हकिकत आपल्या आईवडिलांना सांगितली.
कागदपत्रासाठी केली खंडणीची मागणी
फेसबुकवरील प्रकारामुळे पीडितेचा भाऊ धीरज पाते याची समजूत काढण्यासाठी गेला. मात्र तुझ्या बहिणीचे कागदपत्रे माझ्याकडे आहेत. जर कागदपत्रे परत हवे असल्यास पाच लाख रुपये द्यावे अशी मागणी केली. त्यानंतर पीडितेने पोलीस स्टेशन गाठून आरोपी धीरज पाते विरोधात तक्रार दाखल केली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार धीरज दिगंबर पाते याच्यावर भांदविचे कलम 376 (2) (N), 363. 384, 465, 471, 419. सोबतच सायबर सेल ऍक्टच्या कलम 66 (3), तसेच अल्पवयीन मुलीवर लैगिंक संबंध ठेवणे यावरून पोस्पो कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे हे स्वत: करीत आहे.